चोरालाही कोरोनाची भीती, पीपीई किट घालून केली चोरी

गावगाडा
Updated Jul 07, 2020 | 14:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोनाचा जगभरात कहर सुरू आहे. आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस रुग्णांवर उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 

ppe kit
चोरालाही कोरोनाची भीती, पीपीई किट घालून केली चोरी 

थोडं पण कामाचं

  • साताऱ्यात पीपीई किट घालून चोराने केली चोरी
  • लॉकडाऊनदरम्यान चोराने घातली होती टोपी, मास्क, जॅकेट आणि ग्लोव्ह
  • कोरोनाच्या कहरादरम्यान चोराने घेतला फायदा

सातारा: एकीकडे राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा(corona patient) आकडा प्रचंड वेगाने वाढत आहे. मात्र साताऱ्यात(satara) एक वेगळीच घटना घडली आहे. कोरोनाची भीती कोणाला नाही. काही ठिकाणी तर कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याच्या बातमीही समोर आल्या होत्या. चोरांनाही कोरोनाची भीती आहे. मात्र ही भीती असताना एका चोराने चक्क पीपीई किट(ppe kit) घालून चोरी केल्याची बातमी समोर आली आहे. राज्यातील सातारा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. यावेळी चोराने सोन्याच्या दुकानातून तब्बल ७८० ग्रॅम सोने चोरले. सोन्याचे दुकान फोडून त्याने ही चोरी केली. 

या बाबत पोलिसांनी तपासादरम्यान दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. या सीसीटीव्ही फुटेजमधून ही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोराने शोकेस तसे कपाटातून सोन्याचे दागिने चोरले. याे फुटेज समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. 

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की लॉकडाऊनदरम्यान कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी चोराने पुरेपूर काळजी घेतली आहे. चोराने टोपी, मास्क, प्लास्टिक जॅकेट आणि हँड ग्लोव्हज घातले होते. या प्रकरणी दुकानमालकाने तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुकानातून चोराने ७८ तोळे(१ तोळे = १० ग्रॅम) सोने चोरल्याची माहिती दुकानदाराने पोलिसांना दिली. दुकानादाराने पुढे हीही माहिती दिली की चोर भिंत पाडून दुकानात शिरला. 

कोरोनाबाधितांचा आकडा वाढता वाढे

महाराष्ट्रातील लॉकडाऊन शिथिल केल्यापासून राज्यात सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५३६८ रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २,११,९७८ इतकी झाली. तर कालच्या दिवसांत ३५२२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,१५,२६२ इतकी आहे. राज्यात सध्या ८७६९९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत २०४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. 

चार दिवसांत १५ हजार रुग्ण झाले बरे

महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांत १५ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आतापर्यंत कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या एकूण १,१५,२६२ इतकी आहे. राज्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.३७ टक्के इतके आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी