महाराष्ट्रातील हे शहर बनलं प्युअर व्हेज, मासांहार करण्यास बंदी

पुणे जिल्ह्यात, संत तुकारामांचे जन्मस्थान असलेल्या देहू येथील नगर पंचायत प्रशासनाने मांस आणि मासे विक्रीवर बंदी घातली आहे.

This city in Maharashtra has become a pure veg, a ban on carnivores
महाराष्ट्रातील हे शहर बनलं प्युअर व्हेज, मासांहार करण्यास बंदी ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देहू बनले शुद्ध शाकाहारी शहर आहे.
  • नगर पंचायतीत मांसाहारावर बंदी ठराव
  • शहर परिसरात मांस आणि मासे विक्रीवर बंदी

पुणे : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात, संत तुकारामांचे जन्मस्थान असलेल्या देहू येथील नगर पंचायत प्रशासनाने मांस आणि मासे विक्रीवर बंदी घातली आहे. कच्चे आणि शिजवलेले मांस आणि मासे विक्रीवर बंदी शुक्रवारपासून लागू झाली. यासोबतच मंदिर परिसराच्या आजूबाजूला असलेल्या इंद्रायणी नदीत मासेमारी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे देहू हे शुद्ध शाकाहारी शहर बनले आहे. (This city in Maharashtra has become a pure veg, a ban on carnivores)

अधिक वाचा : Marathi Bhasha Bhavan । Gudipadva । Gudhi Padawa । गुढीपाडव्याला मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन

महाराष्ट्रातील भक्ती परंपरेशी निगडित प्रसिद्ध संतांपैकी एक तुकाराम यांचा जन्म १७व्या शतकाच्या सुरुवातीला या शहरात झाला आणि हजारो भक्त दररोज त्यांच्या मंदिराला भेट देतात. देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव म्हणाले की, 25 फेब्रुवारी रोजी नगर पंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा झाली.

अधिक वाचा : Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ९११ कोरोना Active, आज १२३ रुग्ण, २ मृत्यू

या बैठकीत वारकऱ्यांच्या (विठ्ठलाचे भक्त) व स्थानिक रहिवाशांच्या मागणीचा विचार करून देहू शहरात मासे व मांस विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

अधिक वाचा : मुंबई मेट्रोवरून श्रेयवादाची लढाई, भाजपचे 'काम केलंय, मुंबईनं पाहिलंय' बॅनर शहरात झळकले

ते म्हणाले की, मंदिरांचे शहर असल्याने पूर्वी फक्त काही दुकाने मांसाहारी वस्तू विकत असत, पण तीही आता बंद झाली आहेत. तुकाराम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त संजय मोरे म्हणाले की, शहरात मासे व मांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी सर्वपक्षीयांकडून करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी