एका मंत्र्यांनाच धमकी..... पोलीस दल काय करतंय? गृहमंत्र्यांंचं विधानसभेत निवेदन

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली. या व्यक्तीचं कर्नाटकाशी असलेलं कनेक्शन समोर आलं. त्यानंतर हा मुद्दा सुनील प्रभू विधानसभेत मांडण्यात आला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकी प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेमध्ये सविस्तर निवेदन दिलं आहे.

Threatening aaditya thackeray ..... What is the police force doing? Statement of Home Minister in the Legislative Assembly
एका मंत्र्यांनाच धमकी..... पोलीस दल काय करतंय? गृहमंत्र्यांंचं विधानसभेत निवेदन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली
  • या मुद्द्यावरून आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जोरदार चर्चा झाली.
  • गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेमध्ये सविस्तर निवेदन दिलं आहे.

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात गुरुवारी राडा झाला. यावेळी सभागृहात राज्याच्या एका मंत्र्यांनाच धमकी कशी येते? त्यावर पोलीस दल काय करतंय? या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांमध्ये जोरदार चर्चा झाली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सविस्तर निवेदन दिले.

आदित्य ठाकरेंना तीन वेळा फोन

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ८ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाने  व्हॉट्सअॅपवर मेसेज करून धमकी दिली होती. तो संशयित आरोपी स्वतःला दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा फॅन असून त्याने सुशांतच्या राजपूतच्या मृत्यूला जबाबदार ठरवत असून जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला. तत्पूर्वी त्याने आदित्य ठाकरे यांना तीन वेळा फोन केला होता. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर सायबर पोलिसांनी बेंगळुरूतून अटक केली. 

दोन्ही बाजूच्या आमदारांकडून सरकार प्रश्नांची भडिमार

कालपासून मुंबई राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे या विषयाची चांगली चर्चा झाली. त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी यावर चिंता व्यक्त केल्यानंतर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी त्याविषयी भूमिका मांडली.  या पार्श्वभूमीवर नेमका हा काय प्रकार आहे? राज्याच्या एका मंत्र्यांनाच धमकी कशी येते? त्यावर पोलीस दल काय करतंय? या मुद्द्यावरून आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जोरदार चर्चा झाली.

एसआयटीची स्थापना

यावर अखेर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सविस्तर निवेदन दिलं. त्या धमकीच्या संदर्भात पोलीस विभागानं तपास केला आहे. धमकी देणाऱ्याचं नाव जयसिंग बजरंगसिंग रजपूत आहे. तो कर्नाटकमधील बेंगलोरचा रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. तिथे ताबडतोब पोलीस पथक रवाना करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नंतर अतिरिक्त मुख्य न्यायाधिकारी बेंगलोर यांच्यासमोर हजर करून ट्रान्झिट रिमांडद्वारे त्याला मुंबईत आणण्यात आलं. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे”, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

विधानसभा सदस्य किंवा एखादा सामान्य नागरिक त्याच्याही आयुष्याची सुरक्षितता तेवढीच महत्त्वाची आहे. या विषयाचा अभ्यास करून राज्यस्तरावर एसआयटीची स्थापना करून त्या माध्यमातून आलेल्या धमक्या, घडलेली घटना आणि भविष्याकाळात त्यासाठी करायची उपाययोजना यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल”, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी