Mumbai Police: मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला आलेल्या मेसेजनं खळबळ, पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला?; बंदोबस्त वाढवला

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 20, 2022 | 11:53 IST

Mumbai Police Threatening Message: ऐन सणासुदीच्या काळातच हा मेसेज आल्यानं मुंबई पोलिसांची चिंता वाढली आहे. मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा मुंबईत बंदोबस्त वाढवला आहे.

Mumbai Police Threatened
मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • मुंबईमध्ये (Mumbai) पुन्हा एकदा हल्ला (Attack) होणार असल्याची धमकी मिळाली आहे.
  • मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमला (Traffic control room) धमकीचा मेसेज (threatening message)आला आहे.
  • ऐन सणासुदीच्या काळातच हा मेसेज आल्यानं मुंबई पोलिसांची चिंता वाढली आहे.

मुंबई: Mumbai Police Has Received  Threatening Message: एक मोठी बातमी समोर येत आहे.  मुंबईमध्ये (Mumbai) पुन्हा एकदा हल्ला (Attack) होणार असल्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमला (Traffic control room)  धमकीचा मेसेज (threatening message)आला आहे. ऐन सणासुदीच्या काळातच हा मेसेज आल्यानं मुंबई पोलिसांची चिंता वाढली आहे.  मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा मुंबईत बंदोबस्त वाढवला आहे.

मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुममधील व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये 6 दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच लवकरच मुंबईत 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली आहे.  मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे.

अधिक वाचा- मंगला आरती दरम्यान मोठा अपघात, चेंगराचेंगरीत गुदमरून दोन भाविकांचा मृत्यू 

पाकिस्तानी नंबरवरून मेसेज 

कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज आल्याची माहिती मिळतेय. अभिनंदन मुंबईमध्ये हल्ला होणार आहे. मुंबईमध्ये हल्ला करण्याची तयारी करत आहे. मी पाकिस्तानमधून आहे. तुमचे काही भारतीय मुंबईला उडवण्यात माझी साथ देत आहेत. मुंबईला उडवण्याची पूर्ण तयारी झाली आहे, आता काहीच वेळ शिल्लक आहे. कधीही हल्ला करू शकतो. 26/11 चा हल्ला लक्षात असेलच. नसेल तर आता पुन्हा एकदा पाहा. ही फक्त धमकी नाही तर प्रत्यक्षात येतोय, असा मेसेज पाठवण्यात आला आहे. 

पुढे मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे की,  जर लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तर ते भारताबाहेरचं दाखवलं जाईल आणि धमाका मुंबईत होईल. भारतात सध्या 6 लोक आहेत, जे हे काम पूर्ण करतील. 

अधिक वाचा- भक्तांवर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत चिरडले 7 भाविक

या मेसेजमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.  मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा मुंबईवर हल्ल्याचं सावट आहे. त्यामुळे आता पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी