three people arrested in connection with the rape of a minor girl in Virar : विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. या प्रकरणात एक तरुणी आणि दोन तरुणांना अटक करण्यात आली. आणखी एका तरुणाचा शोध सुरू आहे.
मुंबईत महिलेची छेड काढणाऱ्यांस शिवसैनिकांनी पकडले
सातवीत शिकत असलेली मुलगी २१ वर्षांच्या एका तरुणीला ओळखत होती. या तरुणीच्या सांगण्यावरून मुलगी एका ठिकाणी पोहोचली. याच ठिकाणी तरुणीला ओळखणारा एक तरुण आणि त्याचे दोन मित्र उपस्थित होते. उपस्थित असलेल्या तीन तरुणांनी जवळच तयार होत असलेल्या गणेशोत्सवाच्या मंडपाजवळील एका खोलीत मुलीला जबरदस्तीने नेले. यानंतर खोलीचा दरवाजा बंद करण्यात आला आणि मुलीवर बलात्कार करण्यात आला.
बलात्कार केल्यानंतर मुलीला दमदाटी करण्यात आली. तोंड गप्प ठेवण्याची अट घालून मुलीला तिच्या घराजवळ कमी गर्दीच्या परिसरात सोडून देण्यात आले. मुलगी तिथून घरी पोहोचली. घरी पोहोचताच मुलीने आईवडिलांना काय घडले त्याची माहिती दिली. यानंतर मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी मुलीने दिलेल्या माहितीआधारे तपास सुरू केला. बलात्कार प्रकरणात एक तरुणी आणि दोन तरुणांना अटक करण्यात आली. आणखी एका तरुणाचा शोध सुरू आहे.
ज्या ठिकाणी बलात्कार झाला त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी काही पुरावे गोळा केले. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच मुलीचे कपडे तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. ज्या तीन जणांना
अटक करण्यात आली त्यांनी घटनेच्या वेळी कोणते कपडे घातले होते याबाबत चौकशी करून ते कपडे पण ताब्यात घेण्यात आले आहेत.
अल्पवयीन असल्यामुळे मुलीची ओळख पोलिसांनी जाहीर केलेली नाही. चौथ्या आरोपीबाबत मुलीकडून आणि अटक केलेल्या तिघांकडून जास्तीत जास्त माहिती घेण्यात आली आहे. या माहितीआधारे चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे. अटक केलेले तिन्ही आरोपी तसेच शोध सुरू असलेला चौथा आरोपी हे सर्वजण २० ते २२ वर्षे या वयोगटातील आहेत.