शिंदे-फडणवीसांचं ठरलं !, दिवाळीनंतर नाराज आमदारांसाठी शोधून काढला 'रामबाण' उपाय

Maharashtra : शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे, मात्र केवळ राज्यमंत्र्यांचेच पद रिक्त असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

To keep the MLAs of Shinde faction calm, the heads of the boards and corporations will be made first
शिंदे-फडणवीसांचं ठरलं !, दिवाळीनंतर आमदारांसाठी काढला रामबाण उपाय ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळ विस्ताराचे संकेत
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी सांगितले
  • शिंदे गटातील नाराज आमदारांना संधी

मुंबई :  शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटले तरी दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होताना दिसत नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या आणि विशेषत: शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता वाढल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच विस्तार होणार आहे. असे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केले आहे. (To keep the MLAs of Shinde faction calm, the heads of the boards and corporations will be made first)

अधिक वाचा : दिवाळीच्या दिवशीही सुटी न घेता काम करणार अधिकारी कर्मचारी

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट केले. फडणवीस यांनी तारीख स्पष्ट केली नसली तरी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे निश्चितपणे पत्रकारांना सांगितले. सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात फक्त कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. सध्या 18 जणांना मंत्री करण्यात आले आहेत. त्यामध्ये शिंदे गटाचे 9 आणि भाजपच्या 9 जणांना मंत्रिपद देण्यात आले होते.अडचण एवढीच आहे की त्यांनी बहुतांश राज्यमंत्री बनवण्याचे संकेत दिले आहेत.

अधिक वाचा : ulhasnagar | इमारत उडायची होती म्हणून पठ्ठ्याने एकामागून एक सोडले राॅकेट, Video पाहून पाहून थरकाप उडेल ...

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर प्रहार संघटनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांना आमदार बच्चू कडू यांनीही पाठिंबा दिला होता. मात्र शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्री न केल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. शिंदे यांच्यासोबत बंड करून गेले त्यांच्यावर अन्याय झाला, नंतर आलेल्यांना मंत्री केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र त्यानंतर पुढील मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला नक्कीच संधी दिली जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. तसेच संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे, भरत गोगावले यांच्या नावाची चर्चा आहे, तर भाजपकडून प्रवीण दरेकर, नितेश राणे यांच्या नावांची चर्चा आहे.

अधिक वाचा : molestation Case : व्याकरण शिकवणाऱ्या मास्तरचं होतं खराब चिरित्र, क्लासमधील मुलींचा करायचा विनयभंग, 11 विद्यार्थिनीं केलीय तक्रार

नाराज आमदारांना शांत करण्यासाठी, राज्य सरकार सरकारी मंडळे आणि महामंडळांमधील नियुक्त्यांची यादी तयार करत आहे. जेणेकरून मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यास आमदार बंड करू नयेत. एकनाथ शिंदे गटातील आमदारांना प्रथम महामंडळ आणि मंडळांमध्ये जागा देऊन शांत केले जाईल, त्यानंतरच मंत्रिमंडळाची यादी तयार होईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी