Independence Day 2022: RSS मुख्यालयात फडकला तिरंगा , संघप्रमुख म्हणाले- आता भारताने आत्मनिर्भर व्हायला हवे

गावगाडा
भरत जाधव
Updated Aug 15, 2022 | 12:32 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) मुख्यालयावर किंवा आरएसएस (RSS) तिरंगा स्वीकारत नसल्याची टीका अनेकवेळा विरोधकांकडून केली जाते. विरोधकांच्या या टीकेला आरएसएसनं यावर्षी आपल्या कार्यालयात तिरंगा फडकवून उत्तर दिलं. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत (Chief Mohan Bhagwat) यांनी सांगितले की, भारताला मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळाले असून त्याला स्वावलंबी होण्याची गरज आहे.

Triranga  hoisted at RSS headquarters
क्या बात क्या बात ! RSS मुख्यालयात फडकला तिरंगा   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील नागपूर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात फडकला तिरंगा
  • देश आणि समाज त्यांना काय देतो हे लोकांनी विचारू नये, तर ते देशाला काय देत आहेत याचा विचार करायला हवा. - मोहन भागवत
  • भारत जगाला शांतीचा संदेश देईल- आरएसएस सरसंघसंचालक

Independence Day celebration Nagpur: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) मुख्यालयावर किंवा आरएसएस (RSS) तिरंगा स्वीकारत नसल्याची टीका अनेकवेळा विरोधकांकडून केली जाते. विरोधकांच्या या टीकेला आरएसएसनं यावर्षी आपल्या कार्यालयात तिरंगा फडकवून उत्तर दिलं. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत (Chief Mohan Bhagwat) यांनी सांगितले की, भारताला मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळाले असून त्याला स्वावलंबी होण्याची गरज आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील नागपूर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर भागवत यांनी तेथे आयोजित केलेल्या मेळाव्याला संबोधित करताना भारत जगाला शांतीचा संदेश देईल, असे सांगितले.

'आपण देशाला काय देत आहोत याचा विचार करण्याची गरज'

संघप्रमुख म्हणाले की, देश आणि समाज त्यांना काय देतो हे लोकांनी विचारू नये, तर ते देशाला काय देत आहेत याचा विचार करायला हवा. आजचा दिवस अभिमानाचा आणि दृढनिश्चयाचा आहे. मोठ्या संघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे सर्वांनी मिळून स्वावलंबी होण्याची गरज आहे. 

कडेकोट बंदोबस्तात फडकवण्यात आला तिरंगा 

संघ मुख्यालयात कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात काही RSS स्वयंसेवक आणि प्रचारक उपस्थित होते. रेशमबाग परिसरात असलेल्या डॉ. हेडगेवार स्मारक समितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये नागपूर महानगरचे सहसंघचालक श्रीधर गाडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आरएसएसचे स्वयंसेवक सायंकाळी 5 वाजता शहराच्या विविध भागात ‘पथ संकल्प’ (मार्च पास्ट) करणार आहेत.

जय जवान, जय किसान, जय विज्ञान आता जय अनुसंधान 

आज हा स्वातंत्र्याचा सण देशभर अभिमानाने साजरा केला जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित केले आणि नव्या भारताच्या नव्या युगाचे दर्शन घडवले. पीएम मोदी म्हणाले, 'लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान, जय किसानचा नारा दिला होता आणि त्यात अटलबिहारी वाजपेयींनी जय विज्ञान जोडले होते. आता मी यात जय अनुसंधान जोडतो. कारण या अमृतकाळासाठी नवनिर्मिती फार महत्त्वाची आहे. आज 75 साल बाद मेड इन इंडिया गन से सलामी दी गई.  आज 75 वा डिजिटल क्रांतीने नवीन जग निर्माण होत आहे. जेव्हा जग आरोग्य सेवाची चर्चा करते तेव्हा, ते भारताच्या योग आणि आयुर्वेदाकडे पाहतं असते. ही विरासत आहे जी आपण इतर जगाला देत आहोत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी