Two dead and 23 injured after private bus overturns on Mumbai Goa highway : मुंबई गोवा हाय वे वर पहाटे अपघात झाला. कणकवली येथे गडनदीवरील वागदे पुलाजवळ धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून खासगी बस उलटली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 23 जण गंभीर जखमी झाले. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पुण्याहून गोव्याच्या दिशेने जात असलेल्या खासगी बसला अपघात झाला. अपघातात शैलजा प्रेमानंद माजी (५६ दोडामार्ग) आणि अण्णा गोविंद नाले (५२ सातारा) यांचा मृत्यू झाला.