Bike Thief : अहमदनगर : तोफखाना उपनगरासह शहरातील विवीध भागातून दुचाकी चोरून त्या दुचाक्यांची बनावट कागदपत्रे बनवून अनेकांना दुचाकी वाहन विक्री करणाऱ्या चोरट्याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान त्याच्याकडून चोरी केलेल्या तब्बल 23 दुचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. आरोपी कृष्णा पोपट सापते हा बीद जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचा रहिवासी आहे. सापते दुचाकी वाहनांची चोरी केल्यानंतर त्या वाहनांची बनावट कागदपत्रे तयार करून पैश्यांची गरज असल्याचे सांगूत लोकांना दुचाकी विकत असे. दरम्यान त्याने चोरलेल्या वाहनापैकी एका दुचाकी वाहनाचा cctv सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकू शकतो या भीतीने त्याने चोरलेली ती गाडी पुन्हा त्याच भागात बेवारस स्थितीत सोडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचं वेळेस तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
अहमदनगरमध्ये बनावट कागदपत्रे दाखवून चोरीचे दुचाकी विकणारा गजाआड — Timesnowmarathi (@timesnowmarathi) June 4, 2022
वाचा सविस्तरhttps://t.co/7CveokbNCo pic.twitter.com/jC3LHNLWNo
पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर चौकशी केली असता तब्बल 23 मोटरसायकली त्याने अनेकांना बनावट कागदपात्राच्या आधारे विकल्याचे कबूल केले. दरम्यान पोलिसांनी चोरी केलेल्या 23 मोटरसायकली हस्तगत केल्या आहे. दरम्यान दुचाकी चोरी करणारा हा एकटा नसून यामागे बनावट कागदपत्रे बनविणारी देखील टोळी असल्याची शक्यता असल्याने पोलिस अधिक तपास करत आहे.