Swine Flu: ठाणेकरांना सावध होण्याची वेळ, Swine Flu चे बळी; दोन महिलांचा मृत्यू

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 25, 2022 | 17:47 IST

Swine flu increasing In Thane: आता मुंबई आणि ठाणे (Thane) परिसरात स्वाईन फ्लूच्या (swine flu) वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Swine flu
ठाण्यात दोन महिलांचा स्वाईन फ्लूने मृत्यू  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे.
  • ठाण्यात दोन महिलांचा स्वाईन फ्लूनं बळी घेतल्याची माहिती समोर येत आहे.
  • कोरोनामुळे (Corona) मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक अजूनही दहशतीखाली जगत आहे.

ठाणे: Swine Flu Death In Thane: ठाणेकरांसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसात मुंबईसह (Mumbai)  ठाण्यात ही मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसासोबतच साथीच्या आजारांनी डोकंवर काढलं आहे. वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यातच ठाण्यात दोन महिलांचा स्वाईन फ्लूनं बळी घेतल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनामुळे (Corona)  मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक अजूनही दहशतीखाली जगत आहे. त्यांची अजूनही दहशत कमी झालेली नाही. तेच आता मुंबई आणि ठाणे (Thane) परिसरात स्वाईन फ्लूच्या (swine flu)  वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. 

2022 मध्ये मुंबईत स्वाईन फ्लूच्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद झाली आहे. या वर्षी आतापर्यंत स्वाईन फ्लूचे एकूण 62 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मुंबई शेजारील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात रूग्ण आढळून आले आहेत. त्याचवेळी ठाण्यात गेल्या आठवड्यात संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे ठाणे महापालिकेसह राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा चिंतेत अडकली आहे. रुग्ण आढळलेल्या विभागांसह सर्वच प्रभागांमध्ये वैद्यकीय तपासणीची मोहिम पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे.  

अधिक वाचा-  उभ्या असलेल्या बसनं दिली दुसऱ्या बसला धडक, 8 ठार; 35 हून अधिक जखमी

ठाण्यात स्वाईन फ्लूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू

मुंबई विभागाच्या आरोग्य सेवा उपसंचालक डॉ गौरी राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 24 जुलै 2022 पर्यंत एकूण 1,66,132 नमुने तपासण्यात आले. 62 नमुन्यांमध्ये स्वाईन फ्लू (H1N1) इन्फ्लूएंझा व्हायरसची पुष्टी झाली आहे. गेल्या आठवड्यात ठाण्यात संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी मुंबई विभागात H1N1  व्हायरसमुळे मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.

आतापर्यंत ठाण्यात स्वाईन फ्लूच्या 20 रुग्णांची (Patients) नोंद करण्यात आली आहे.  यापैकी 15 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर 3 रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर दोन महिला रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू (Death) झाला आहे. डॉ गौरी राठोड यांच्या म्हणण्यानुसार, आरोग्य विभाग सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभागानंही नागरिक आणि डॉक्टरांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

स्वाईन फ्लूनं घेतला जीव

पुढे त्यांनी सांगितलं की, स्वाईन फ्लूमुळे जीव गमावलेल्यांमध्ये ठाण्यातील कोपरी भागातील 51 वर्षीय ज्योती राजा बजाज यांचा समावेश आहे. 12 जुलै रोजी त्या आजारी पडल्या. त्यांना ताप, उलट्या आणि खोकल्याची समस्या होती. 18 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याच वेळी कोपरी येथील 72 वर्षीय बबिता हाटे यांचा 19 जुलै रोजी मृत्यू झाला. 9 जुलै रोजी त्या आजारी पडल्या होत्या. खबरदारी म्हणून या महिलांच्या संपर्कात आलेल्या सर्व नातेवाईकांची महापालिका प्रशासनाकडून चाचणी करण्यात आली आहे.

अधिक वाचा-  Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप होणार? अजित पवारांनी थेट आणि स्पष्टच दिलं उत्तर

डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये ही वाढ 

स्वाईन फ्लू सोबतच डेंग्यू आणि मलेरियाच्या रूग्णामध्ये वाढ होत चालली आहे. ठाण्यात सध्या डेंग्यूचे 8 तर मलेरियाचे 14 रुग्ण आढळून आले आहेत. मात्र या आजारानं एकाचाही मृत्यू झालेला नसल्याचं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. पालिकेकडून आतापर्यंत जवळपास 600 घरांमध्ये सर्व्हेक्षण करण्यात आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी