Uday Samant Car Attack:उदय सामंत गाडी हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून शिवसैनिकांची धरपकड, शहर प्रमुखासह 5 जणांना अटक

गावगाडा
पूजा विचारे
Updated Aug 03, 2022 | 10:48 IST

Shiv Sainik vs Shinde group Rada in Pune: पुण्यातल्या कात्रज चौकात (Katraj Chowk) शिवसैनिकांनी सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला. या घटनेनंतर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

Attack on Uday Samant car
उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला 
थोडं पण कामाचं
  • पुण्यातल्या कात्रज चौकात (Katraj Chowk) शिवसैनिकांनी सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला.
  • या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली आहे.
  • या घटनेनंतर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

पुणे: Uday Samant Car Attack Case: शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. पुण्यातल्या कात्रज चौकात (Katraj Chowk)  शिवसैनिकांनी सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला.  या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी या हल्ल्या प्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे  (Shiv Sena city chief Sanjay More) यांना अटक करण्यात आली आहे. मोरे यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आतापर्यंत एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली. यानंतर संजय मोरे यांनी ट्वीट ही केलं आहे. या प्रकरणात संजय मोरे यांना पहिली अटक केली गेली. यादरम्यान त्यांनी ट्विट करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचं म्हटलं आहे. 

अधिक वाचा- महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज फैसला, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष


मोरे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. यात सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांच्यासह राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रूपेश पवार यांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय 15 जणांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संजय मोरे म्हणाले की, आमच्यावर गंभीर आरोप करुन गजानन थरकुडे, संभाजीराव थोरवे, राजेश पळसकर, सुरज लोखंडे, चंदन साळुंखे , विशाल धनवडे, अनिकेत घुले, रुपेश पवार आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यावर भारती विद्यापीठ स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. 

हल्ल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया 

उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, पोलिसांकडे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून तुम्हाला वस्तुस्थिती समजेल. माझ्यापुढे आदित्य ठाकरे यांचा ताफा नव्हता. मी खोटं काहीही सांगणार नाही. जे सांगेन ते पोलिसांना सांगेन. पुढे ते म्हणतात की, आम्ही तानाजी सावंत यांच्या घरी जात होतो. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा ताफा पुढे गेला होता. त्यानंतर सिग्नल लागले. मी कोणाचाही ताफा फॉलो करत नव्हतो. सिग्नल लागल्यामुळे मी नियमप्रमाणे थांबलो होतो. यावेळी माझ्या बाजूला दोन गाड्या आल्या. त्यांच्या हातात जे होते, त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. बाजूला 50 ते 60 शिवसैनिक होते. मात्र शिवसैनिकांनी काहीही केलेले नसून फक्त 12 ते 15 लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. 

जो काही प्रकार घडला आहे त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे, असं ही त्यांनी म्हटलं आहे. ज्यांनी हल्ला केला त्यांच्याकडे शस्त्रे कशी आली. त्यांच्या हातात दगड कसे आलं. तसंच त्यांना माझ्या गाडीचा नंबर कसा समजला. याचा तपास केला पाहिजे, असे सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केले आहेत.  हल्ले करणारे मला शिव्या घालत होते. या घटनेतून मी वाचलो आहे. परमेश्वराचे आणि मतदारसंघातल्या जनतेचे माझ्यावर आशीर्वाद आहेत. मात्र झालेला प्रकार निंदनीय असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. 

घटनेनंतर उदय सामंत यांचं पहिलं ट्विट 

उदय सामंत यांनी गाडीवर हल्ला झाल्यानंतर सोशल मीडियावर ही प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

गद्दार म्हणता तरी शांत आहे...शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे..लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र, असं उदय सामंत यांनी ट्विट केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी