Udayanraje Bhosale । उदयनराजेंचे राॅयल कार कलेक्शन, आलिशान वाहनांच्या ताफ्यात BMW ची भर

Udayanraje Bhosale । उदयनराजे त्यांच्या हटके अंदाजामुळे तरुणाईत भलतेच 'फेमस' आहेत. सर्वत्र मोठ्या प्रमाणात चाहते असून त्यांच्या हटके अंदाजासाठी त्यांना तरुणाई सोशल मीडियावर फाॅलो करत असतात.

 Udayan Raje's Royal Car Collection, BMW's addition to the fleet of luxury vehicles
उदयनराजेंचे राॅयल कार कलेक्शन, आलिशान वाहनांच्या ताफ्यात BMW ची भर।  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • उदयनराजे भोसले यांचे राॅयल कार कलेक्शन
  • नवरात्रौत्सवात बीएमडब्लू कंपनीची एक्स फाईव्ह ही नवीन कोरी कार
  • या आलिशान कारची किंमत एक कोटी रूपये

Udayanraje Bhosale । सातारा : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या हटके स्टाईलमुळे राज्यभर त्यांचे असंख्य चाहते आहेत.उदयनराजेंना अनेक तरुण फाॅलो करतात. त्यांना बाईक रायडींग करणे अधिक पसंत असून त्यांच्याकडे अनेक गाड्यांचे कलेक्शन आहे. आज त्यांच्या गाड्यांच्या राॅयल कलेक्शनमध्ये आणखी एका कारची भर पडली. बीएमडब्लू कंपनीची नवीनकोरी कार खरेदी केली आहे. त्याचा फोटो सोशल मिडियावर भलताच व्हायरल झाला. यावरुन त्यांची तरुणाईमध्ये किती क्रेझ आहे याची प्रचिती दिली आहे. (Udayan Raje's Royal Car Collection, BMW's addition to the fleet of luxury vehicles)

उदयनराजेंची तरुणाईत भलतेच 'फेमस' आहेत. सोशल मिडियावर तर त्यांचे लाखो फाॅलोवर असून त्यांच्या स्टाईलची अनेक जण काॅपी करतात. साताऱ्यात उदयनराजेंचे समर्थक जेव्हा नवीन गाडी विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला येतातच. अनेक वेळा स्वतः उदयनराजेंनी त्याची रायडिंग केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. 

उदयनराजेंना गाड्यांचा छंद आहे.त्यांच्या ताफ्यामध्ये सध्या ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, मारुती जिप्सी या चार आलिशान कार आहेत. तर त्यांच्या पत्नी दमयंतीराजेंकडे पोलो ही कार आहे. त्यांच्या या राॅयल कलेक्शनमध्ये आणखी एक कार दाखल झाली आहे. बीएमडब्लू कंपनीची एक्स फाईव्ह ही नवीन कोरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत एक कोटी रूपये आहे.

त्यांच्या सर्व गाड्यांना 007 हा नंबर असून त्यांच्या अनेक समर्थकांच्या गाड्यांचाही हाच क्रमांक आहे. उदयनराजेंनी नवीन खरेदी केलेल्या बीएमडब्लू कारला एमएच ११ डी डी ००७ हाच नंबर घेतला आहे. आज पुण्यातून गाडी खरेदी करतानाचा त्यांचा शोरुममधील फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्याला अनेकांनी दाद दिली यावरुन समाज माध्यमांत उदयनराजेंची किती क्रेझ आहे, याचा अंदाज नक्कीच आला असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी