Udayanraje vs Shivendraraje : उदयनराजेंचे सर्जिकल स्ट्राईक, शिवेंद्रराजेंनी स्वनिधीतून उभारलेल्या सेल्फी पाॅईंटच्या उद्घाटनापूर्वी केलं फोटोशूट

Udayan Raje's Surgical Strike : साताऱ्यात पोवई नाका येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी स्वखर्चातून 'सेल्फी पॉईंट' उभारला आहे. आज (मंगळवार) सायंकाळी सहा वाजता उद्घाटन होणार आहे. त्या आधीच खासदार उदयनराजेंनी कडक सेल्फी काढला.

Udayan Raje's Surgical Strike, Shivendra Raje did a photoshoot before the inauguration of the Selfie Point
उदयनराजेंचे सर्जिकल स्ट्राईक, शिवेंद्रराजेंनी स्वनिधीतून उभारलेल्या सेल्फी पाॅईंटच्या उद्घाटनापूर्वी केलं फोटोशूट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जिल्हा बॅंक व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले
  • खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात आरोप-प्रत्यारोप
  • शिवेंद्रराजेंच्या प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या सेल्फी पाॅईंटवर जाऊन उदयनराजेंनी केलं फोटोशूट

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. त्यात आज सातारा शहरात पोवई नाका येथे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वखर्चातून 'सेल्फी पॉईंट' उभारला आहे. त्याचं आज सायंकाळी सहा वाजता होणार होते. दरम्यान, दुपारी उदयनराजे यांनी अचानक सेल्फी पॉईंटची पाहणी करुन सहकाऱ्यांसमवेत तेथे फोटो काढले. (Udayan Raje's Surgical Strike, Shivendra Raje did a photoshoot before the inauguration of the Selfie Point)

शिवेंद्रसिंहराजे आज उद्घाटन करणार होते

सातारा शहराच मुख्य ठिकाण असलेल्या पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या 'राजधानी सातारा' या सेल्फी पॉईंटची उभारणी करण्यात आली आहे. या सेल्फी पॉईंटचे लोकार्पण मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार होते. त्या आधीच खासदार उदयनराजेंनी सेल्फी पॉईंटची पाहणी केली. तेथे उदयनराजेंनी देखील सहकाऱ्यांसमवेत तेथे फोटो काढले. आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी स्वखर्चातून उभारलेल्या 'सेल्फी पॉईंट'ची खासदार उदयनराजेंनी पाहणी केल्याने शिवेंद्रसिंहराजे त्याला कसे उत्तर देणारे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

उदयनराजेंच्या भेटीगाठी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. सध्या राष्ट्रवादीसोबत भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते उदयनराजेंना जवळ करण्यास तयार नाहीत. दरम्यान, या राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये घ्यावे, या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी मागील सर्व मतभेद विसरून भेटीगाठीचे सत्र सुरू ठेवले आहे. यासाठी त्यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह सर्वच पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी करुन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या व काही विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

भाजपच्या खासदार आणि आमदारांना भेट नाकारली

उदयनराजेंच्या भेटीगाठीमध्ये ते विशेषतः राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना भेटत आहेत. राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपचे आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पॅनेल टाकण्याची तयारी केली आहे. मात्र, उदयनराजेंनी त्यांची अद्याप भेट घेतली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी