अखेर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, 'या' तारखेला होणार मतदान

Udayanraje Bhosale: आगामी विधानसभा निवडणुकीसोबतच आता सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.

udayanraje bhosale bjp satara by election 2019 parliamentary constituency lok sabha eci maharashtra politics news marathi
अखेर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, 'या' तारखेला होणार मतदान  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा
  • सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने केली जाहीर
  • २१ ऑक्टोबर रोजी होणार सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान

मुंबई: उदयनराजे भोसले यांना एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कारण, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. शनिवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला होता मात्र त्यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर केली नव्हती. निवडणूक आयोगाने लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर न केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणूक ही विधानसभा पोटनिवडणुकीसोबतच होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी ही २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि विजयी सुद्धा झाले. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केल्याने सातारा पोटनिवडणूक सुद्धा विधानसभा निवडणुकीसोबतच होईल असा अंदाज सर्वांना होता. मात्र, निवडणूक आयोगाने शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा उल्लेखच नव्हता त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. 

पण आता अखेर निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा पोट-निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार आगामी विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.

सातारा पोटनिवडणुकीचं वेळापत्रक 

  1. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - ४ ऑक्टोबर २०१९ 
  2. अर्जांची छाननी - ५ ऑक्टोबर २०१९ 
  3. अर्ज माघार घेण्यची शेवटची तारीख - ७ ऑक्टोबर २०१९ 
  4. मतदानाची तारीख - २१ ऑक्टोबर २०१९ 
  5. मतमोजणी - २४ ऑक्टोबर २०१९ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी