Udayanraje Bhosle : उदयनराजे भोसले यांची एक संतप्त फेसबुक पोस्ट, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा

Udayanraje Bhosle Angry FB Post : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी पुण्यात जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाली. यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक संतप्त पोस्ट लिहिली आहे.

udayanraje bhosle: An angry Facebook post by Udayan Raje Bhosale, targeting NCP leaders
udayanraje bhosle : उदयनराजे भोसले यांची एक संतप्त फेबसुक पोस्ट, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • खासदार उदयनराजे भोसले यांनी एक संतप्त फेबसुक पोस्ट लिहिली
  • कोणत्याही नेत्याचंं नाव घेणं टाळलं पण जोरदार बॅटिंग
  • जिल्ह्यातील निर्णय जिल्ह्यातच झाले पाहीजेत बैठक कुठंतरी बोलावली

Udayanraje Bhosle Angry FB Post :  सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या (Satara District Bank)निवडणुकीच्या (Election)पार्श्वभूमीवर सातारा (satara)जिल्ह्यातील नेत्यांची पुण्यात बैठक झाली. यावर खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosle)यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक संतप्त पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सातारा जिल्ह्याचे निर्णय जिल्ह्यातच झाले पाहिजे, असा आग्रह धरला. तसेच कोणत्याही नेत्याचे नाव न घेता, त्यांच्यावर निशाणा साधला आहे. (udayanraje bhosle: An angry Facebook post by Udayan Raje Bhosale, targeting NCP leaders)

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी पुण्यात जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाली. ही बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. परंतु काही कारणास्तव अजित दादा या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी रामराजे यांनी जिल्हा बँकेच्या मतदार संघ निहाय आढावा घेतला. बैठकीत शिवेंद्रराजे यांनी सातारा मतदारसंघात मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे सातारा तालुक्यात चार जागांची मागणी केली. सातारा तालुक्‍यातील माझे मतदान पॅनलबरोबर राहील, असे शिवेंद्रराजेनी बैठकीतच जाहीर करुन टाकले. कराड सोसायटी मतदार संघातून उदयसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरी या सोसायटी मतदार संघातूनच आपण लढणार असल्याचे सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी ठामपणे सांगितले. एवढेच नाही तर कराड तालुक्‍याचे मतदान जास्त आहे.  बँका, पतसंस्था मतदार संध तर मुळचा आमचाच आहे. या मतदारसंघासह महिला, मागास प्रवर्ग व एनटी हे मतदार संघ हे अन्य तीन मतदारसंघ मेरिटच्या निकषावर आम्हाला मिळाले पाहिजेत, अशी आग्रही भूमिका ना. बाळासाहेब पाटील यांनी घेतली.

उदयनराजेंनी म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील निर्णय जिल्ह्यातच झाले पाहीजेत बैठक कुठंतरी बोलावली आहे. वास्तविक जे मतदार तुम्हाला मत देणार आहेत, आजपर्यंत मत देत आले आहेत, त्यांची मतेमतांतरे अजमावण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेसारखी बैठक बोलवली असती तर ते संयुक्तिक ठरले असते, असं म्हटलं आहे.

मतदान यालाच करा, त्यालाच करा असं बंधन आवश्यक नाही ज्यावेळी नको ती लोकं निवडुन बँकेत जातात, त्यावेळेस सहकारी संस्था मोडकळीस आल्या, काही संस्था लिक्वीडेशनमध्ये गेल्या, खाजगीकरण झाले, काही जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका सुध्दा दिवाळखोरीत गेल्याची उदाहरणे आहेत, ज्यांनी सहकारी संस्था स्थापन केल्या, ज्यांनी त्या संस्था मोडकळीस आणल्या, खाजगीकरण केले, त्या लोकांना बँकेच्या व शेतकरी सभासदांच्या लोकहितासाठी बँकेपासून दूर ठेवणे आणि जिल्ह्याचे निर्णय जिल्ह्यातील व्यक्तींनी सार्वमत अजमावून घेणे आजच्या घडीला गरजेचे आहे असे शेतकरी सभासदांच्या वतीने आम्हाला वाटते, परंतु आमचे म्हणणे पचवता येणारे नसल्याने, पटणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी