उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी शिंदे गटाच्या वाटेवर

uddhav thackeray faction leader rajan salavi meet uday samant in ratnagiri : उद्धव ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार राजन साळवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

uddhav thackeray faction leader rajan salavi meet uday samant in ratnagiri
उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी शिंदे गटाच्या वाटेवर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी शिंदे गटाच्या वाटेवर
  • आमदार राजन साळवी यांनी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली
  • साळवी आणि सामंत यांच्यात एक तास चर्चा झाली

uddhav thackeray faction leader rajan salavi meet uday samant in ratnagiri : उद्धव ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार राजन साळवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आमदार राजन साळवी यांनी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीनंतर आमदार साळवी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

आमदार साळवी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेतली. दोघांमध्ये एक तास चर्चा झाली. मतदारसंघातील कामांबाबत बोलण्यासाठी उद्योगमंत्र्यांना भेटल्याचे आमदार साळवी यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. मात्र ही भेट अचानक झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. 

काही दिवसांपूर्वीच आमदार राजन साळवी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. पण मी उद्धव ठाकरे गटातच आहे, असे आमदार साळवी म्हणाले होते. मात्र उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभा खासदार गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. किर्तीकर यांच्या पक्षप्रवेशामुळे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या लोकसभेतील खासदारांची संख्या 13 झाली आहे. यानंतर आमदार राजन साळवी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी 1 तास चर्चा केली. यामुळेच आमदार राजन साळवी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

भारतात 14 डिसेंबरपर्यंत होणार 32 लाख विवाह

Alert : येत आहे शनि साडेसाती आणि शनि ढय्या

खासदार गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत, CM शिंदेंना दिला पाठिंबा

लोकसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. यानंतर खासदार किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम मुंबईत रवींद्र नाट्यमंदिर येथे झाला. 

खासदार गजानन किर्तीकर यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या लोकसभेतील खासदारांची संख्या 13 झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे लोकसभेत 6 आणि राज्यसभेत 3 असे 9 खासदार उरले आहेत. 

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या लोकाधिकार समिती महासंघाचा कार्यक्रम झाला. गजानन किर्तीकर लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष आहेत. पण महासंघाच्या कार्यक्रमाला किर्तीकर गैरहजर होते. या गैरहजेरीवरून चर्चेला उधाण आले होते. मुंबईत दसरा मेळाव्यात गजानन किर्तीकर यांनी जाहीरपणे आपली नाराजी मीडियासमोर व्यक्त केली होती. या दोन घटनांमुळे गजानन किर्तीकर उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडणार अशी शक्यता व्यक्त होत होती. अखेर ही शक्यता प्रत्यक्षात आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी