'मातोश्री'बाहेर उध्दव ठाकरेंनी जोडले हात! राणा दाम्पत्य हनुमान चालिसा पठणावर ठाम

hanuman chalisa controversy : महाराष्ट्रातील लाऊड ​​स्पीकरचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केली आहे.

Uddhav Thackeray joins hands outside 'Matoshri'! Rana couple announces to recite Hanuman Chalisa
'मातोश्री'बाहेर उध्दव ठाकरेंनी जोडले हात! राणा दाम्पत्याने हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा हनुमान चालिसा पठण करणार
  • शुक्रवारी शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर मोठी गर्दी केली होती. 
  • कायदा व सुव्यवस्था बिघडण्याच्या दृष्टीने राणा दाम्पत्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात लाऊडस्पीकरनंतर आता हनुमान चालिसावरुन (hanuman chalisa) राजकारण तापले आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा  (navnit rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांनी उद्या सकाळी ९ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घर मातोश्रीबाहेर (matoshri) हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली. दरम्यान, शुक्रवारी मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त ठेवले आला होता. सकाळपासूनच वांद्रे उपनगरातील मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले. आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ((Uddhav Thackeray)) यांनी हात जोडले. (Uddhav Thackeray joins hands outside 'Matoshri'! Rana couple announces to recite Hanuman Chalisa)

अधिक वाचा : पाच महिन्यानंतर राज्यभरात ST पूर्ण क्षमतेनं धावणार; कमी राहत असलेल्या 16 हजार फेऱ्या होणार पूर्ण

महाराष्ट्रातील लाऊड ​​स्पीकरचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली आहे. नवनीत राणा आणि त्यांचे पती शुक्रवारी मुंबईत पोहोचले. पोलिसाच्या म्हणण्यानुसार, राणा दाम्पत्य खारमधील त्यांच्या घरात राहिले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याच्या भीतीने झोन-९ चे डीसीपी मंजुनाथ सेंगे यांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला राणा दाम्पत्य जबाबदार असेल, असे पोलिसांनी नोटीसमध्ये लिहिले आहे.

आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्रात एवढी समस्या असून आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही कोणत्याही मंत्रालयात जात नाहीत, कधी आम्हाला भेटत नाहीत आणि आमच्या भागाला भेट देत नाहीत. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात साडेसाती सुरु आहे. यामुळेच आपण त्यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करणार आहोत. हनुमान हे संकटमोचन असून ते मुख्यमंत्र्यांचे संकट नक्कीच दूर करतील.

अधिक वाचा : कच्ची हळद शिजवताना घडली विचित्र घटना, शेतकऱ्याचा जाग्यावर मृत्यू तर पत्नी गंभीर, नेमकं काय घडल नक्की वाचा

त्याचवेळी आमदार नवनीत राणा यांनी सांगितले की, आम्हाला बाहेर पडू नका, अशी नोटीस देण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते म्हणून आम्ही एकटेच हनुमान चालीसा वाचणार आहोत. मुंबईकरांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आम्ही शांततेने जाणार आहोत. आम्ही पोलिसांना सहकार्य करू, यासोबतच ज्या भाविकांना तेथे यायचे आहे, त्यांनी येऊ नये, असे आवाहनही आम्ही केले.

अधिक वाचा : राज ठाकरेंच्या सभेला पोलिसाकडून अद्याप परवानगी नाही, मनसे 'हा' निर्णय घेण्याच्या तयारीत

23 एप्रिल रोजी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचल्याची माहिती मिळताच मातोश्रीसह मुंबईच्या आसपासच्या परिसरात मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले. राणा दाम्पत्याने मातोश्रीवर पोहोचून दाखवावे, असे आव्हान शिवसैनिकांनी दिले आहे. दरम्यान, सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मातोश्रीवर पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, अनिल देसाई उपस्थित होते. यावेळी उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना हात जोडून त्यांचे आभार मानून ही शिवसेनेची ताकद आहे, असे म्हटले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी