शिवसेनेत एकामागोमाग एक बंडखोरांची हकालपट्टी सुरूच..!, बांगर यांच्यानंतर 'या' जिल्हाप्रमुखांना बाहेरचा रस्ता

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 12, 2022 | 09:33 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यानं हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Uddhav Thackeray and Eknath shinde
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.
 • शिंदे गटाला साथ देणाऱ्या समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यास सुरूवात झाली आहे.
 • काल हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना जिल्हाप्रमुख पदावरून काढण्यात आलं.

मुंबई: गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक प्रकारचा धक्काच मानला जातो. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे आता कारवाई करताना दिसत आहेत. शिंदे गटाला साथ देणाऱ्या समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यास सुरूवात झाली आहे. काल हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना जिल्हाप्रमुख पदावरून काढण्यात आल्यानंतर शिवसेनेचे आमदार आणि पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यानं हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून हकालपट्टीच्या कारवाई संदर्भातलं वृत्त देण्यात आलं आहे. 

अधिक वाचा-  Maharashtra Rain Update : आजही राज्यात मुसळधार पाऊस कायम राहणार, 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर उद्धव ठाकरे सक्रिय झाले आहेत. शिवसेना पक्षात स्थानिक पातळीवरील नेतृत्त्वात बदल करण्यात येत आहेत. शिवसेनेनं पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अनिता बिर्जे यांची ठाणे, पालघर महिला जिल्हा संपर्क संघटकपदी नेमणूक केली आहे. 

शिवसेनेत नव्यानं झालेली निवड 

 • अनिता बिर्जे (ठाणे व पालघर जिल्हा)- महिला जिल्हा संपर्क संघटक
 • समिधा मोहिते ( विधानसभा ठाणे, ओवळा-माजीवाडा)- संघटक- ठाणे जिल्हा महिला जिल्हा 
 • रेखा खोपकर- विधानसभा कोपरी- पाचपाखाडी, मुंब्रा- कळवा) 
 • महेश्वरी तरे, संपदा पांचाळ, आकांक्षा राणे- महिला उपजिल्हा संघटक
 • स्मिता इंदुलकर (ठाणे विधानसभा)- महिला शहर संघटक
 • वासंती राऊत -ओवळा माजीवडा विधानसभा
 • प्रमिला भांगे- कोपरी-पाचपाखाडी विधानसभा
 • मंजिरी ढमाले (ठाणे शहर)-  महिला उपशहर संघटक
 • कुंदा दळवी- ठाणे शहर विधानसभा
 • शीतल हुंडारे (मिंढे) (ओवळा – माजीवडा विधानसभा)- महिला विधानसभा क्षेत्र संघटक
 • संपदा उरणकर ( खोपट, विकास कॉम्प्लेक्स आणि परिसर)- महिला विभाग संघटक
 • नंदा कोथले- गोकुळनगर, आझादनगर
 • राजश्री सुर्वे (खोपट विभाग)- महिला उपविभाग संघटक 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी