UGC NET Final Answer Key, Result 2021: आज जाहीर होऊ शकते यूजीसी नेट परीक्षेची अंतिम उत्तरतालिका?; निकाल येणार या दिवशी

UGC NET Final Answer Key, Result 2021 | यूजीसी नेट परिक्षेची अंतिम उत्तरतालिका Result ugc.nta.nic.in या वेबसाइटवर लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यूजीसी नेट परिक्षेची अंतिम उत्तरतालिका आज किंवा उद्या जाहीर होण्याची संभावना वर्तवली जात आहे. यानंतर परिक्षेस पात्र ठरलेले उमेदवार लवकरच यूजीसी नेट परिक्षेचा निकाल तपासण्यासाठी थेट लिंक शोधण्यात सक्षम होतील.

 UGC NET Final Answer Key 2021 be released today? The result will come on this day
आज जाहीर होऊ शकते यूजीसी नेट परीक्षेची अंतिम उत्तरतालिका?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यूजीसी नेट परिक्षेची अंतिम उत्तरतालिका Result ugc.nta.nic.in या वेबसाइटवर लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीने २१ जानेवारी २०२२ ला NET २०२१ ची तात्पुरती उत्तरतालिका जारी केली होती.
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेली लिंक बंद करण्यात आली आहे.

UGC NET Final Answer Key, Result 2021 | मुंबई : यूजीसी नेट परिक्षेची अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key)  Result ugc.nta.nic.in या वेबसाइटवर लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यूजीसी नेट परिक्षेची अंतिम उत्तरतालिका आज किंवा उद्या जाहीर होण्याची संभावना वर्तवली जात आहे. यानंतर परिक्षेस पात्र ठरलेले उमेदवार लवकरच यूजीसी नेट परिक्षेचा निकाल तपासण्यासाठी थेट लिंक शोधण्यात सक्षम होतील. UGC NET २०२१ च्या अधिसूचनेनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने २१ जानेवारी २०२२ रोजी UGC NET २०२१ ची तात्पुरती (Provisional) उत्तरतालिका ugcnet.nta.nic.in वर UGC NET २०२१ च्या अधिकृत वेबसाइटवर जारी केली होती. ज्यावर फक्त २४ जानेवारीपर्यंत तपासले जाऊ शकते. आता ही लिंक बंद करण्यात आली आहे. (UGC NET Final Answer Key 2021 be released today? The result will come on this day). 

अधिक वाचा : विरोधीपक्षाने नामर्दपणे मुख्यमंत्र्यांवर टीका केली-संजय राऊत


डिसेंबर २०२० आणि जून २०२१ चे निकाल एकत्रित येणार

यूजीसी नेट २०२१-२२ ची उत्तरतालिका एनटीएने (NTA) विलीन केलेल्या डिसेंबर २०२० आणि जून २०२१ फेरीसाठी जारी केली होती. त्यामुळे आता हे निश्चित झाले आहे की अंतिम उत्तरतालिका आणि यूजीसी नेट निकाल दोन्ही फेरींसाठी एकत्रित लागतील. 

अधिक वाचा : उपांत्यपूर्व फेरीत भारत-बांगलादेश आमनेसामने

कधी येणार यूजीसी नेटचा निकाल? 

सामान्यत: तात्पुरती उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर एका आठवड्याच्या अगोदरच अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाते, कारण यूजीसी नेटची तात्पुरती उत्तरतालिका २१ जानेवारीला जाहीर झाली होती. यानंतर या विंडोला २४ जानेवारीला बंद केले, आता आतापासून आठवड्याभरचा कालावधी गृहीत धरला तर ३१ जानेवारी २०२२ पर्यंत यूजीसी नेटची उत्तरतालिका आणि यूजीसी नेटचा निकाल दोन्हीही जाहीर होण्याची संभावना आहे. 

अंतिम उत्तरतालिकेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार यूजीसी नेट २०२१ (UGC NET 2021) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. लवकरच UGC NET 2021 निकालासंबंधी अधिसूचना येऊ शकते. जर तुम्हाला पुढच्या वेळी ही परिक्षा द्यायची असेल तर UGC NET 2021 च्या पात्रतेनुसार खुल्या किंवा अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांनी पदव्युत्तर किंवा पदवीमध्ये किमान ५५% गुण मिळवलेले असावेत. या वर्षासाठी UGC NET ऑनलाइन फॉर्म आणि UGC NET 2021 परीक्षेची तारीख देखील लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी