रेल्वेस्थानकांवर अल्ट्राव्हायोलेट लाइट आधारित स्वच्छता सुविधा सुरू होणार

कोविड १९ चा धोका लक्षात घेता प्रवाशांना त्यांचे सामान करण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह काही मोठ्या रेल्वेस्थानकांवर अल्ट्राव्हायोलेट लाइट आधारित स्वच्छता सुविधा सुरू केली आहे

Ultraviolet light based cleaning facilities will be introduced at railway stations
रेल्वेस्थानकांवर अल्ट्राव्हायोलेट लाइट आधारित स्वच्छता सुविधा सुरू होणार  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह काही मोठ्या रेल्वेस्थानकांवर अल्ट्राव्हायोलेट लाइट आधारित स्वच्छता सुविधा सुरू केली आहे
  • अधिकाऱ्यांनी सांगितले की नुकत्याच सुरू झालेल्या या सुविधेअंतर्गत प्रवाशांचे सामान सर्व बाजूंनी अल्ट्राव्हायोलेट लाइट किरण असलेल्या मशीनद्वारे स्वच्छ केले जाईल.
  • अधिकाऱ्यांनी सांगितले की या किरणांमुळे सामानाच्या बाह्य पृष्ठभागावर असणारे सर्व प्रकारचे विषाणू, जीवाणू आणि जंतु नष्ट होतील

मुंबई : कोविड - १९ चा धोका लक्षात घेता प्रवाशांना त्यांचे सामान करण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह काही मोठ्या रेल्वेस्थानकांवर अल्ट्राव्हायोलेट लाइट आधारित स्वच्छता सुविधा सुरू केली आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नुकत्याच सुरू झालेल्या या सुविधेअंतर्गत प्रवाशांचे सामान सर्व बाजूंनी अल्ट्राव्हायोलेट लाइट किरण असलेल्या मशीनद्वारे स्वच्छ केले जाईल.

अधिकाऱ्यांनी सांगितले की या किरणांमुळे सामानाच्या बाह्य पृष्ठभागावर असणारे सर्व प्रकारचे विषाणू, जीवाणू आणि जंतु नष्ट होतील. स्वच्छता केल्यानंतर, सामान 'संसर्गमुक्त' असा स्टिकर चिकटवून प्रवाशांच्या स्वाधीन केले जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की काही निश्चित किंमत दिल्यानंतर प्रवासीही त्यांच्या वस्तू चांगल्या प्रकारे पॅक करू शकतात. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले, “अल्ट्राव्हायोलेट लाइट-बेस्ड सॅनिटायझिंगची सुविधा किफायतशीर दराने दिली जात आहे आणि वस्तूंच्या आकारानुसार दर आकारला जाईल,”
 
सुतार म्हणाले की, १० किलोग्रॅमच्या वस्तूंच्या स्वच्छतेसाठी दहा रुपये, २५ किलोग्रॅमसाठी १५ रुपये आणि २५ किलोग्रामपेक्षा जास्त वजनाच्या वस्तूंसाठी २० रुपये शुल्क आकारले जाईल. ते म्हणाले की १० किलो वस्तूच्या रॅपिंगसाठी ६० रुपये द्यावे लागतील, २५ किलोग्रॅम वस्तूंना ७० रुपये आणि २५ किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या वस्तूंसाठी ८० रुपये द्यावे लागतील. आणखी एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, सामान स्वच्छ करण्यासाठी ही सुविधा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण स्टेशन येथे उपलब्ध असेल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दादर, ठाणे आणि पनवेल स्थानकांवरही ही सुविधा सुरू करण्याचा विचार केला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी