Unseasonal rain and hailstorm in Beed district of Maharashtra damage crops :
सुकेशनी नाईकवाडे, बीड :
महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे पिके नष्ट झाली. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर शेतीचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला. अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्यामुळेही नुकसान झाले. पिके वाहून गेली.
निसर्ग कोपला. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. अवकाळी पाऊस आणि गारपीट यांचा तडाखा बसल्यामुळे बीड जिल्ह्यात 15 जनावारांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. जिल्ह्यात गारपीट झालेल्या भागांमध्ये पिकांची वाताहात झाली. मोठ्या गारा पडल्यामुळे साठवण केलेल्या भागांमध्ये तसेच अनेक घरांवर बसवलेल्या पत्र्यांची चाळण झाली. यामुळे मोठी वित्तहानी झाली.
बीड जिल्ह्यात वीज अंगावर पडल्यामुळे 60 वर्षीय शेतकरी महादेव किसन गर्जे (रा. सुर्डी) यांचा मृत्यू झाला. गर्जे यांच्यासोबत असलेल्या दोन शेळ्या पण दगावल्या. तिप्पटवाडी येथे वीज अंगावर पडल्यामुळे दोन बैलांचा मृत्यू झाला. शेतकरी आनंता नामदेव शेडगे यांचे नुकसान झाले. देवगाव येथे वीज पडून नारायण मुंडे यांचा बैल तर मांगवडगाव येथे वीज पडून दत्तू मुळूक यांची गाय दगावली. रामेश्वरवाडी शिवारात जयराम तुकाराम हंगे यांचा 1 बैल आणि 1 गाय तसेच शशिकांत संपतराव हंगे यांचा 1 बैल वीज पडून दगावले.
मांगवडगाव येथील सरु बाई गुणवंत गायकवाड आणि सुकुमार रामधन गायकवाड या एकाच घरातील शेतकऱ्यांचे सोलारचे दोन सेट वादळी वाऱ्याने पूर्णपणे उखडून गेले. पोखरी घाट येथे शेतकरी संदिपान अंबादास झांजुर्णे यांच्या शेतातील कांदा चाळीवरील सिमेंट पत्र्यांची चाळण झाली .
AI ने तयार केले दिग्गजांचे सेल्फी घेतानाचे फोटो
काचेच्या ग्लासमधूनच का पितात दारू?