वैदर्भीय भाषेत गणीत शिकविणाऱ्या व्हायरल गुरूजी नितेश कराळे यांचा अग्नीपथ योजनेला विरोध

केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्मी भरतीच्या अग्निपथ योजना रद्द करण्यात यावी यासाठी आज वर्ध्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात कराळे सर प्रतिष्ठाण संघर्ष समिती तर्फे भव्य आंदोलन करण्यात आले.

Vaidarbhaya Bhashat Geet Shikvinayaya Viral Guruji Nitesh Karale Yancha Agneepath Yojana protest
 WARDHA | केंद्राने'अग्निपथ' योजना रद्द करावी - कारळे सर  
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्मी भरतीच्या अग्निपथ योजना रद्द करण्यात यावी
  • वर्ध्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात कराळे सर प्रतिष्ठाण संघर्ष समिती तर्फे भव्य आंदोलन करण्यात आले.
  • केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्मी भरतीच्या अग्निपथ योजनेमुळे देशाच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

वर्धा : केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्मी भरतीच्या अग्निपथ योजना रद्द करण्यात यावी यासाठी आज वर्ध्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात कराळे सर प्रतिष्ठाण संघर्ष समिती तर्फे भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्मी भरतीच्या अग्निपथ योजनेमुळे देशाच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

4 वर्षाचा काळ त्यांना नियम शिकण्यासाठीच लागतो. त्यापैकी 1.5. वर्ष ट्रेनिंग पिरियडमध्येच घालावा लागतो. त्यामुळे त्याला भारतीय सिमेवरच्या एखाद्या गुप्त मोहिम राबवायची असल्यास तो अपरिपक्य असल्यामुळे अशा कितीतरी गुप्त मोतिमा अयशस्वी होऊ शकते. यांची दखल केंद्र सरकारने घ्यावी असे मत प्रा. नितेश कराळे यांनी व्यक्त केले.

ही योजना मागे घेण्याची  मागणी यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारताच्या राष्ट्रपतीना भारताचे पंतप्रधान संरक्षण मंत्र्यांना केली.

अग्निपथ'च्या विरोधात शेवगाव मध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे निर्दशने

अहमदनगर : अग्निपथ या केंद्र सरकारने आणलेल्या लष्कराच्या नोकरभरतीच्या नियमाच्या विरोधात आज शेवगाव मध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. 

केंद्र सरकारने लष्कराच्या भरतीमध्ये अग्निपथ ही नवीन योजना आणल्यामुळे याचा प्रचंड रोष भारताच्या विविध राज्यांमध्ये दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज शेवगाव मध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी आणि शहा यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली व केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातामध्ये लाल झेंडे व फलक पहावयास मिळाले.

यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ऍड सुभाष लांडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव संजय नागरे, रतन मगर, सुभाष चव्हाण, अशोक शिंदे, बाबूलाल सय्यद, जि प सदस्य रामभाऊ साळवे, प्रेम अंधारे, राहुल पवार, जयश्री ससाने, असलम भाई शेख, राजू गायकवाड, विजू मगर, तानाजी मोहिते, अजय मगर , लक्ष्मण नांगरे, विष्णू घनवट, सुखदेव गोरे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी