Vasai Landslide: वसईत दरड कोसळली, सहा पैकी 4 जणांची सुटका; अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 13, 2022 | 11:50 IST

Vasai Landslide: वसईत दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील वसईच्या राजवली वाघरल पाडा येथे दरड कोसळली आहे.

Vasai Land Slide
वसईत दरड कोसळली  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • वसईत दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
  • पालघर जिल्ह्यातील वसईच्या राजवली वाघरल पाडा येथे दरड कोसळली आहे.
  • दोघांना दरडीखालून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वसई:  वसईत दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील वसईच्या राजवली वाघरल पाडा येथे दरड कोसळली आहे. दरडीखाली अडकलेल्या सहा पैकी चार जणांची सुटका करण्यात आली. तर दोघांना दरडीखालून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वसई-विरारचे फायरब्रिगेड, पोलीस आणि स्थानिक यांच्या समन्वयातून मदतकार्य सुरू आहे.

पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पालघरमधील वसईत दरड कोसळल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या वालीव पोलीस, वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्य जोरात सुरू आहे.

अधिक वाचा-  मुंबईकरांनो तब्येतीची काळजी घ्या..!, कोरोनापाठोपाठ आता 'या' आजारांनी डोकंवर काढलं आहे

पालघरमध्ये रेड अलर्ट 

पालघर जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. 12 जुलै ते 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान विभाग मुंबईकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.  मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात पुढील 2.3 तास मध्यम तीव्रतेचा पाऊस होण्याची शक्यता  वर्तवण्यात आली आहे.

मुंबईतील पावसाची स्थिती 

मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरातही जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षित मुंबईतही (South Mumbai) मुसळधार (Heavy rains)पावसानं हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे.  माहीम, दादर, परळ, भायखळा (Mahim, Dadar, Paral and Byculla) भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. आज मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती  हवामान विभागानं दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी