राहुल गांधींनंतर आता संजय राऊतांचा नंबर?, हक्कभंग कारवाईचा चेंडू उपराष्ट्रपतीच्या कोर्टात

sanjay raut rajya sabha membership : काॅंग्रेसचे नेते राहुल गांधींचे संसदेतील सदस्यत्व रद्द केल्यानंतर, आता ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांचीही खासदारकी धोक्यात आल्याचे दिसत आहे.

राहुल गांधींनंतर आता संजय राऊतांचा नंबर?, हक्कभंग कारवाईचा चेंडू उपराष्ट्रपतीच्या कोर्टात
Vice President will take action against Sanjay Raut  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • संजय राऊत यांच्यावर हक्कभंग कारवाई
  • 'चोर मंडळी' प्रकरण पडणार महागात
  • उपराष्ट्रपती जगदीप धनखर निर्णय घेणार

मुंबई : काॅंग्रेसचे नेते राहुल गांधींनंतर आता संजय राऊत यांची खासदारकी धोक्यात आली आहे. चोर मंडळींच्या वक्तव्याचे प्रकरण आता राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांच्यापर्यंत पोहोचले आहे. आता याप्रकरणी उपराष्ट्रपती धनखर काय निर्णय घेतात यावर राऊत यांच्या सदस्यत्वाचा निर्णय अवलंबून आहे. (Vice President will take action against Sanjay Raut)

अधिक वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !, जुनी पेन्शन योजनेच्या मागणीपुढे सरकार झुकले?

या महिन्याच्या सुरुवातीला, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापी निलम गोर्‍हे यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांना भारतीय जनता पक्षाने दिलेल्या विशेषाधिकार भंगाच्या नोटीसला उत्तर देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर राऊत यांनी उत्तर पाठवले असता ते असमाधानकारक असल्याचे सांगण्यात आले. गोर्‍हे यांनी परिषदेत बोलताना सांगितले की, राऊत यांनी त्यांच्या उत्तरात सभागृहाच्या विशेषाधिकार समितीची रचना, तिची निष्पक्षता आणि कामकाजावर प्रश्न उपस्थित केले होते.

अधिक वाचा : Rahul Gandhi disqualified from Lok Sabha: राहुल गांधींची खासदारकी रद्द 

त्याबद्दल त्या म्हणाल्या- "राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य असल्याने त्यांनी (राऊत) विशेषाधिकार समितीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणे अपेक्षित नाही. त्यामुळे त्यांच्या प्रतिसादाशी मी पूर्णपणे सहमत नाही आणि मला ते समाधानकारक वाटत नाही. राऊत हे राज्यसभा सदस्य असल्याने हे प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे पाठवण्यात आले आहे.

कोल्हापुरात दौऱ्यावर असताना खा. संजय राऊत यांनी शिंदे गटावर टिका करताना हे विधानमंडळ नसून चोरांचे मंडळ असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यावरून संजय राऊत यांच्यावर शिंदे गट आणि भाजपने जोरदार टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र विधानसभेचे कामकाजही विस्कळीत झाले होते. राऊत यांच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणण्यात आला आणि संजय राऊत यांनी विधानसभेच्या विरोधात केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्याची चौकशी करण्यासाठी सभापतींनी एक समिती स्थापन केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी