अखेर भाजप, सेना आणि मनसेचे जुळलं, पण कोणालाही कळण्यात नाकी'नऊ'

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि शिवसेनेचे सूत जुळल्याचे आपण पाहिलेले आहे. पण तुम्हांला सांगितले की भाजप, शिवसेना आणि मनसेचे एका बाबतीत एकमत झाले आहे.

vidhansabha election 2019 bjp shiv sena alliance  upcoming assembly election raj thackeray mns 9 digit lucky for mahayuti   news in marathi
अखेर भाजप, सेना आणि मनसेचे जुळलं, पण कोणालाही कळण्यात नाकी'नऊ'  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि शिवसेनेचे सूत जुळल्याचे आपण पाहिलेले आहे. पण तुम्हांला सांगितले की भाजप, शिवसेना आणि मनसेचे एका बाबतीत एकमत झाले आहे. तर तुमचा विश्वास बसणार नाही.  सेना, मनसे आणि भाजप यांना जोडणारा समान धागा म्हणजे दुसरे तिसरे कोण नाही तर ९ ही संख्या आहे. आतापर्यंत मनसे, राज ठाकरे हे  या संख्येला खूप लकी मानत असल्याचे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. पण ९ ही संख्या भाजप आणि शिवसेनाही खूप लकी मानते आणि त्या दृष्टीने त्या दोघांनीही निवडणुकीला सामोरे जाताना  आकडा खूप जपला आहे. तो आकडा एकूण गोळाबेरजेत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. 

 मतदानाच्या तारखेपासून ते निवडणुकीच्या निकालपर्यंत हा आकडा योगायोगाने आला आहे. पण दोन्ही पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागा वाटपाही ९ हा आकडा दोन्ही पक्षांनी जपला आहे. तुम्हांला विशेष वाटेल पण यातील काही गोष्टी आत्ता स्पष्ट होत आहेत तर काही गोष्टी जागा वाटपाचा फाॅर्म्युला जाहीर झाल्यानंतर सिद्ध होणार आहे.  कोणत्या गोष्टीत आहे ९ आकडा हे जाणून घेऊ या... 

१) भाजप आणि शिवसेना हे आकड्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे यंदाची निवडणुकीची तारीख आणि मतमोजणीची तारीख यांच्या आकड्यांची बेरीज केली तर ती होते.  यात मतदानाची तारीख २१ ऑक्टोबर आहे तर मत मोजणी ही २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यातील सर्व आकड्यांची बेरीज केली तर ती बेरीज होते ( २+१+२+४ =

२) तसेच भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपच्या आकड्यांच्या खेळातही या आकड्याचे प्राबल्य  मोठे असल्याचे दिसते आहे. आतापर्यंत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप १४४, शिवसेना १२६ आणि मित्र पक्ष यांना १८ जागा निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रत्येक आकड्यांची बेरीज केली तर ती ९ येते. 

  1. भाजप = १+४+४=

  2. शिवसेना =१+२+६=

  3. मित्र पक्ष = १+८= ९ 

त्यामुळे मनसे प्रमाणे शिवसेना आणि भाजपही अंकाच्या प्रेमात पडले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा नऊ आकडा या दोन्ही पक्षांसाठी नवी 'नऊ'लाई आणेल की युतीला नाकी'नऊ' करून सोडेल हे २४ ऑक्टोबरला कळणार आहे. 

राज ठाकरे यांनी आपल्या पक्ष स्थापनेचा दिवस  मार्च हा जाणूनबुजून ठेवला आहे. तसेच त्यांच्या प्रत्येक अभियानाची किंवा प्रचार सभेची तारीख ही च्या आसपास असते. त्यामुळे हा ९ आकडच्या प्रेमामुळे हे भाजप-सेना आणि मनसेचं एका बाबतीत तरी जुळलं असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात मनसे या दोघांविरूद्ध शड्डू ठोकून उभी आहे, हे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी