विनायक मेटेंच्या कारने धडक दिलेला ट्रक आणि चालक सापडला

विनायक मेटे यांच्या अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक पालघर जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या मालकीचा होता.

Vinayak Mete Accident Truck Driver Responsible For Accident Arrested From Daman Vehicle Seized
विनायक मेटेंच्या कारने धडक दिलेला ट्रक आणि चालक सापडला 
थोडं पण कामाचं
  • विनायक मेटेंच्या कारने धडक दिलेला ट्रक आणि चालक सापडला
  • पोलिसांनी जप्त केला ट्रक
  • ट्रक चालकाला पोलिसांनी दमणमधून केली अटक

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज (रविवार १४ ऑगस्ट २०२२) पहाटे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मेटे यांच्या कारला अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. या अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक पालघर जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या मालकीचा होता. हा ट्रक पोलिसांनी तपासाकरिता जप्त केला आहे. ट्रकचा चालक अपघातानंतर ट्रक घेऊन पळून गेला होता. पोलिसांनी या ट्रक चालकाला शोधून अटक केली.  ( Vinayak Mete Accident Truck Driver Responsible For Accident Arrested From Daman Vehicle Seized )

Vinayak Mete: मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे अपघाती निधन

विनायक मेटे यांच्या फोर्ड एन्डेवेर कारला आयशर कंपनीच्या ट्रकने धडक दिली होती. DN 09 P 9404 असा ट्रकचा नंबर होता. पोलिसांनी या नंबरवरून ट्रक मालकाचा पत्ता शोधला. ट्रकचा मालक महाराष्ट्र - गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्यातील कासा येथील रहिवासी आहे. पोलीस ट्रक मालकापर्यंत पोहोचले त्यावेळी ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाल्याची माहिती मालकाने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी ट्रक मालकाच्या मदतीनेच फरार ट्रक चालक दमणमध्ये असल्याची माहिती मिळविली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून ट्रक जप्त केला आणि ट्रक चालक उमेश यादव याला दमणमधून अटक केली. या प्रकरणात कायद्यानुसार पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

बीड जिल्ह्यात सोमवारी अंत्यसंस्कार

विनायक मेटे यांचे पार्थिव उद्या (सोमवार १५ ऑगस्ट २०२२) सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत बीड जिल्ह्यातील शिवसंग्राम भवन या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. नंतर विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी