CM Eknath Shinde: विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 14, 2022 | 10:56 IST

Vinayak Mete Death News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूग्णालयात धाव घेतली. यानंतर मुख्यमंत्री (Chief Minister) आणि उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे.

Chief Minister Reaction on Vinayak Mete death
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश  
थोडं पण कामाचं
  • शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे.
  • मेटे यांच्या निधनाची बातमी कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूग्णालयात धाव घेतली.
  • यानंतर मुख्यमंत्री (Chief Minister) आणि उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे.

रायगड: Shiv Sangram leader Vinayak Mete has passed away: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे.  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway)त्यांच्या गाडीचा अपघात घडला. त्यानंतर त्यांना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूग्णालयात धाव घेतली. यानंतर मुख्यमंत्री (Chief Minister) आणि उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. 

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश 

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेवर माझा विश्वास बसत नाही आहे. मराठा समाजासाठी सातत्यानं लढणारा एक नेता हरपला, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

विनायक मेटेंच्या सहकाऱ्याने घटनास्थळी वेळेवरर मदत पोहचली नसल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात माहिती तपासली जाईल. संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.  पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की,  गेल्याच आठवड्यात विनायक मेटे मला भेटले होते, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली.

सरकार कुटुंबीयांसोबत- एकनाथ शिंदे 

आज आम्ही मराठा समाजाच्या आरणासंदर्भातील एक महत्त्वाची बैठक बोलावली होती.  पण बैठकीला येत असतानाच मेटे यांचे अपघाती निधन झालं. या निधनामुळे विनायक मेटेंच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सरकार त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. सकाळी प्रथम हे वृत्त समजले, तेव्हा त्यावर माझा विश्वासच बसला नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत. 

अधिक वाचा- हैवान झाला मुख्याध्यापक, मारहाणीत फुटली कानाची नस; तिसरीतल्या दलित विद्यार्थ्याचा मृत्यू

मराठा आरक्षणासाठी मोठा संघर्ष

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विनायक मेटेंनी अनेक आंदोलने केली. मराठा आरक्षणासाठी ते सातत्याने संघर्ष करत होते. मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी त्यांची मोठी धडपड, तळमळ होती. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया 

सरकार मेटे कुटुंबीयांच्या पाठिशी असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवसंग्रामचे नेते, आमचे सहकारी, माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असंही उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत.  मेटे यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सतत संघर्ष केला. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी ते नेहमी आग्रही होते, असे फडणवीस म्हणालेत.

विनायक मेटे यांचे अपघाती निधन 

आज पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली. अपघातानंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्या गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे.  मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी