Food Poisoning: एकाच कुटुंबातल्या पाच लहान मुलांना विषबाधा, दोन चिमुरड्यांचा मृत्यू; तिघांवर उपचार सुरू

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 14, 2022 | 12:05 IST

virar news: विरारमध्ये एकाच कुटुंबातल्या पाच लहान मुलांना विषबाधा (poisoned) झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे एकाच कुटुंबातल्या पाच लहान मुलांना अन्नातून ही विषबाधा (Food poisoning) झाल्याचं समजतंय.

Virar Food Poisoning
विरारमध्ये अन्नातून विषबाधा 
थोडं पण कामाचं
  • एकाच कुटुंबातल्या पाच लहान मुलांना अन्नातून ही विषबाधा (Food poisoning) झाल्याचं समजतंय.
  • यातल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
  • तीन मुलांवर पालिकेच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

विरार: Virar Food Poisoning: विरारमध्ये एकाच कुटुंबातल्या पाच लहान मुलांना विषबाधा (poisoned) झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे एकाच कुटुंबातल्या पाच लहान मुलांना अन्नातून ही विषबाधा (Food poisoning) झाल्याचं समजतंय. यातल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर तीन मुलांवर पालिकेच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शनिवारी ही घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पाचही मुलांना विषबाधा झाली असून त्यातील 8 वर्षीय मुलीचा आणि 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अधिक वाचा-  Terror Attack: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दहशतवादी हल्ल्यानं हादरलं जम्मू-काश्मीर, ग्रेनेड हल्ल्यात जवान जखमी

मृतदेह पाठवले शवविच्छेनासाठी 

सध्या पोलिसांनी पाच जणांपैकी मृत लहान मुलांचे मृतदेह शवविच्छेनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेन अहवालानंतर दोन लहान मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे हे स्पष्ट होईल अशी माहिती मांडवी पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

पाचही जणांना होऊ लागल्या उलट्या 

एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पाचही मुलं रात्रीचं जेवण करून झोपले. त्यानंतर सकाळी पाचही लहान मुलांना उल्टा आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातल्या पाच जणांपैकी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. 

विरार पूर्व टोकरे ग्रामपंचायत टोकरे पाडा इथली ही घटना आहे. टोकरे येथील भोयपाडा या गावात अश्फाक खान आणि रजियाबानू खान हे आपल्या पाच मुलांसह राहतात. शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास या सर्वांनी एकत्र जेवण केलं होतं. जेवल्यानंतर हे कुटुंब झोपले. मात्र शनिवारी सकाळी अचानक मुलांची तब्येत बिघडली. पहाटे चारच्या सुमारास त्यांचा 9 वर्षाचा मुलगा आसिफ खान आणि 8 वर्षाच्या मुलगी फरीफ खान यांना उलटी आणि पोटात दुखू लागले. त्यामुळे दोघांना ही विरारच्या भाताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आसिफ आणि फरीफ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

तर 10 वर्षांची मुलगी फराना खान, 4 वर्षाचा मुलगा आरीफ खान आणि 3 वर्षाचा मुलगा साहिल खान यांना तुळींजच्या पालिका रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या मांडवी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी