मुंबई : राज्यसभा निवडणूकीमुळे राज्यातील राजकारण तापले असताना भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोरोना पाॅझिटिव्ह आला होता. एकीकडे महाविकास आघाडीच्या गोटातील हालचालींना वेग आला असताना भाजप गोटात शांतता होती. दरम्यान, गुरुवारी कोविड-19 टेस्ट फडणवीसांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर ते अॅक्शन मोड आल्याचे दिसून आले. सकाळी त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत मिटिंग केली. त्यानंतर सायंकाळी हाॅटेल ताजमध्ये भाजप आमदारांशी संवाद साधला.
अधिक वाचा :
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते फडणवीस यांना रविवारी कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळून आले. तेव्हापासून ते घरामध्ये होम क्वारंटाईन होते. कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतरही फडणवीस यांनी १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी काम करणे थांबवले नाही. कारण राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या मुंबई कार्यालयात झालेल्या महत्त्वाच्या 'रणनीती' बैठकीत त्यांनी डिजिटल पद्धतीने सहभाग घेतला होता.त्याच्या RT-PCR चाचणीचा अहवाल आज गुरुवारी निगेटिव्ह आला.
अधिक वाचा :
SSC Result 2022: दहावीच्या बोर्डाच्या निकालबाबत आली आहे मोठी ताजी अपडेट
राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना भाजपच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी फडणवीस मतांची जुळवाजुळव करण्यासाठी मैदानात उतरले आहे. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये गुरुवारी भाजप आमदारांची बैठक आयोजित करण्यात होती. या बैठकीला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व नेते उपस्थित होते.
अधिक वाचा :
राज्यात कोरोनाचा वेग थांबता थांबेना! गेल्या 24 तासात 2813 नवे रुग्ण, एका रुग्णाचा मृत्यू
यावेळी राज्यसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात आली. फडणवीसांनी आमदारांशी संवाद साधला. ठरलेल्या पॅटर्नप्रमाणे मतदान करा. तुमचं मत बाद होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही फक्त मी सांगतो त्याप्रमाणे मतदान करा आपले तिन्ही उमेदवार निवडणून येतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. फडणवीस मैदानात उतरल्याने भाजप आमदारांचा उत्साह वाढला आहे.