#WATCH राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, दोन वर्षानंतर शोभा यात्रेची धूम ...

हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सर्व घरोघरी गुढी उभारण्यात आली आहे. तसेच विविध शहरात शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या.

#WATCH Gudipadva enthusiasm across the state, Dhoom of Shobha Yatra after two years ...
#WATCH राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, दोन वर्षानंतर शोभा यात्रेची धूम ...   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गुढीपाडवा
  • विविध शहरात शोभायात्रांचे आयोजन
  • लोक ढोल वाजवून नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत.

मुंबई : हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या सणाच्या दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर गुढीपाडवा निर्बंधमुक्त झाल्याने राज्यभरात घरोघरी गुढी उभारण्यात आली. तसेच अनेक शहरात शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. यावेळी तरुण पारंपारिक वेशात मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते (#WATCH Gudipadva enthusiasm across the state, Dhoom of Shobha Yatra after two years ...)

अधिक वाचा : मुंबईकर मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट मार्गात बदल

महाराष्ट्रात आज गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात आहे. घरोघरी गुढी उभारुन नववर्षाची सुरुवात केली जाते. खरेदी करता बाजारातही मोठी लगबग पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा निघतात. तसेच मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांमध्ये शोभायात्रा काढल्या जात आहेत यासंबंधीचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये लोक ढोल वाजवून नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत. 

अधिक वाचा : महाराष्ट्रातील मास्कमुक्तीला पवारांचा विरोध

पुण्यातील कोथरूडमध्ये लोक गुढीपाडवा साजरा करतात.

मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील लोकांनी गिरगाव परिसरात बाईक रॅलीचे आयोजन केले होते.

खामला चौक, नागपूर येथे शोभायात्रा काढण्यात आली. .

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी