नवीन वर्षात मुंबईवर पाणी कपातीचं संकट, ब्रिटीशकालीन जलवाहिनी फुटली

Water cut in Mumbai : शनिवारी मध्यरात्री घाटकोपरमध्ये ब्रिटीशकालीन जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी रस्त्यावर आल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरात पाणी कपातीचे संकट ओढावले होते.

Water pipe burst in Mumbai, water supply cut off in 'these' areas
नवीन वर्षात मुंबईंवर पाणी कपातीचं संकट, ब्रिटीशकालीन जलवाहिनी फुटली  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली
  • रस्त्यावर लाखो लिटर पाणी आल्याने पूरस्थिती
  • उपनगरातील अनेक भागांतील पाणीपुरवठा बंद

मुंबई : घाटकोपर परिसरातील चांदिवली पुलाजवळ ७२ इंच व्यासाची  ब्रिटीशकालीन जलवाहिनी फुटली. जलवाहिनीतून पाण्याचा लोंढा रस्त्यावर आला. काही वेळात पाणी परिसरातील लोकांच्या घरात शिरण्यास सुरुवात झाली. लोकं झोपली असताना त्यांच्या घरात पाणी पाहून घाबरले. त्यांनी तातडीने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण रस्त्यावर पाणी सुमारे १० फुटांपर्यंत उसळत होते. दरम्यान, जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच बीएमसीकडून तातडीने पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला.

अधिक वाचा : दहशतवाद्याच्या घरावर चालवला बुलडोझर, सरकारची मोठी कारवाई 

मुंबई महापालिकेच्यावतीने गळती दुरुस्तीचे काम युदधपातळीवर सुरू असून घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयातून होणारा पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत बंद राहील. त्यामुळे नागरिकांना नववर्षाच्या तोंडावर पाण्याचे संकट उभे राहिले आहे.

शुक्रवारी रात्रीच्यावेळी लोक झोपले असताना घाटकोपरच्या उच्चस्तर जलाशयास पाणीपुवठा करणारी ७२ इंच व्यासाची जलवाहिनी चांदिवली ब्रिज जवळ अचानक फुटली. त्यामुळे जलवाहिनीतून येणाऱ्या या पाण्याचा दाब इतका जोरदार होता की काही वेळाच ते पाणी अनेकांच्या घरात शिरले. त्यामुळे अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू भिजून खराब झाल्या आहेत. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने पाणीपुरवठा बंद केला. त्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाली. मात्र, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. 

अधिक वाचा : Gujarat : नवसारीत चालत्या बसमध्ये चालकाला आला heart attack; बस-कारची धडक, 9 ठार

फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने परिसरातील पाणी पुरवठा खंडीत केला आहे. घाटकोपर उच्चस्तर जलाशयातून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या राम नगर, हनुमान नगर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, शंकर मंदीर, जय मल्हार नगर, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षा नगर, ए व बी कॉलनीचा काही परिसर, डी व सी म्युनिसिपल कॉलनी, रायगड विभाग, आनंदगड, यशवंत नगर, गावदेवी, पठाण चाळ, अमृत नगर, इंदिरा नगर १ व २, अमिनाबाई चाळ, गणेश मैदान, मौलाना कंपाऊंड, हरिपाडा, जगदुषा नगर, कठोडीपाडा, भीमानगर, अल्ताफनगर, गेल्डानगर, गोळीबार मार्ग, नवीन दयासागर, जवाहरभाई प्लॉट, सेवानगर, ओ. एन. जी. सी. कॉलनी, माझगाव डॉक कॉलनी, गंगावाडी गेट नंबर २, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, साईनाथ नगर, पाटीदार वाडी, रामाजी नगर, भटवाडी, बर्वेनगर, काजू टेकडी, अकबरलाला कंपाऊंड, आझादनगर, पारसी वाडी, सोनिया गांधी नगर, खाडी मशीन, गंगावाडीचा काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  संबंधीत परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पाणी जपून वापरावे व महानगर पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक अभियंता (जलकामे) एन विभागाकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी