"चंद्रकांत पाटलांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल" संजय राऊतांनी साधला भाजप नेत्यांवर निशाणा

sanjay raut attack on bjp : देशात फक्त महाराष्ट्र राज्य व्यवस्थित आहे. चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्माचा नंबर चेक करावा लागेल. डॉक्टर लहाने यांचे पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येत का हे पाहावं लागेल, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला.

"चंद्रकांत पाटलांच्या चष्माचा नंबर चेक करावा लागेल" संजय राऊतांनी साधला भाजप नेत्यांवर निशाणा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची अनुपस्थिती
  • भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीवर टिका
  • शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतित्तुर देत लगावला टोला

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेत संवाद साधला. या बैठकीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अनुपस्थित होते. त्यांच्या एेवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीसाठी उपस्थित होते. यावरुन भाजपा नेत्यांनी टीका केली. त्याला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्यांवर निशाना साधला. ("We have to check the number of Chandrakant Patil's spectacles" Sanjay Raut targeted BJP leaders)

भाजपनं चीनच्या मुद्द्यावर बोलावं

संजय राऊत म्हणाले, “भाजपाच्या आय़ुष्यात टीका करण्याशिवाय दुसरं काय आहे. खरं तर भाजपाने चीनने केलेल्या घुसखोरीवर बोललं पाहिजे. तिथे सीमेवर फार गंभीर स्थिती आहे. भारत-पाकिस्तानवर रोज बोलत आहे, पण आता भारत-चीनवर बोला आणि टीका करा”.

देशात फक्त महाराष्ट्र राज्य व्यवस्थित आहे. चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल. डॉक्टर लहाने यांचे पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येत का? हे पाहावं लागेल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ, निरागस आहेत त्यांनी त्यांच्या पुढच्या निवडणुकीची तयारी करावी, असा सल्ला राऊत यांनी दिला. 

गोव्यात महाविकास आघाडीचे प्रयत्न

 गोव्यात आमचे प्रयत्न होते.. काँग्रेसला सोबत घेण्याचे, गोव्याच्या वातावरणात कायम नशा असते. राजकारणाची, ती अजून उतरलेली दिसत नाही. माझ. आतापर्यंत वेणुगोपाल, राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं. पण स्थानिक नेतृत्व जमिनीवर फक्त पाच बोटे चालत आहे. गोव्याबद्दल माझी आणि प्रफुल्ल पटेल यांची चर्चा सुरु आहे. उद्या मला तृणमूल काँग्रेसचे काही नेते भेटणार आहेत. त्यानंतर निर्णय जाहीर करु, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी