Weather Update: हवामानाचा पॅटर्न पुन्हा बदलणार, मुंबई-पुण्यात पारा वाढला, तर या जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा इशारा

Maharashtra Weather update : राज्याच्या बहुतांश भागात आता उकाडा जाणवत आहे. येत्या काही दिवसांत मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान वाढणार आहे. जाणून घेऊया आजच्या हवामानाबाबत काय अपडेट आहे.

Weather: Bad weather warning in the state, temperature will also rise
Weather Update: हवामानाचा पॅटर्न पुन्हा बदलणार, मुंबई-पुण्यात पारा वाढला, तर या जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा इशारा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अवकाळी पावसाचे संकट कायम
  • पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी
  • काही शहरांमध्ये उष्ता वाढली आहे

IMD Weather Update:​ राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पावसासोबत पुणे आणि मुंबईत उष्णतेचा पारा वाढल्याने उकाडा देखील वाढणार आहे. असे असताना मुंबई आणि पुण्यात आज हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Weather: Bad weather warning in the state, temperature will also rise)

अधिक वाचा : MHADA Lottery: सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडा येत्या वर्षभरात 12724 घरे बांधणार

 मार्च महिना अवकाळी पावसात गेला. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच मार्च महिन्याच्या मध्यानंतर राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी पुण्याचा पारा हा ४० पर्यन्त पोहचला होता. तर मुंबईतही उष्णतामान वाढले होते. दरम्यान, या तापमानात पुढच्या दोन दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा : Dombivli : डोंबिवलीत पार्सलच्या पैशावरुन ग्राहक आणि डिलिव्हरी बॉयमध्ये हाणामारी

ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस असतानाही पुणे शहरातील तापमान वाढल्यानं वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पुणे शहरात व जिल्ह्यांत 7, 8, 9 तारखेला विजांच्या कडकडासह शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे. 6 तारखेला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकटासह अवकाळी पाऊस पडणार आहे. त्यानंतर 7, 8 आणि 9 तारखेलाही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे.

मुंबईसह अलिबाग, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, उद्गीर येथेही गुरुवारी कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ नोंदवली गेली. विदर्भात अकोला, ब्रह्मपुरी येथे कमाल तापमानाच पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. तर वर्धा, वाशिम, यवतमाळ येथे ३९ आणि अमरावती, गोंदिया येथे ३८ अंशांच्या पुढे तापमान नोंदवले गेले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी