Weather Update: जोरदार पावसाचा आठवडा, मुंबईसह कोकणात जबरदस्त पाऊस; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 04, 2022 | 11:56 IST

Weather Update: कोकणात देखील पावसानं चांगली हजेरी लावली आहे. पालघर जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरू आहे.

 Maharashtra Rain Updates
महाराष्ट्रात या जिल्ह्यांना झोडपणार पाऊस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या राज्यातल्या विविध भागात पाऊस सुरू झाला आहे.
  • राज्यातल्या अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी सुरू आहेत.
  • मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगला पाऊस पडताना दिसतोय.

मुंबई:  Maharashtra Rain Updates: सध्या राज्यातल्या विविध भागात पाऊस सुरू झाला आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी सुरू आहेत. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगला पाऊस पडताना दिसतोय. तसंच कोकणात देखील पावसानं चांगली हजेरी लावली आहे. पालघर जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरू आहे. येत्या काही दिवसात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

मात्र अजूनही काही भागात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे शेतकरी सध्या पावसाची वाट बघत आहे.  राज्यातील शेतकरी पेरणीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

पुण्यात होणार चांगला पाऊस 

येत्या 48 तासांत ओडिशा आणि लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याची संभाव्य वायव्य दिशेकडे वाटचाल झाली आहे. यामुळे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय होणार आहेत. त्यामुळे येत्या 2 दिवसात पुणे जिल्हा आणि पुणे शहर या ठिकाणी 5 तारखेच्या संध्याकाळपासून पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामाने खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे.

अधिक वाचा-  शिंदे-फडणवीस सरकारची आज खरी परीक्षा, बहुमत चाचणी होणार; सत्ताधारी-विरोधक येणार आमनेसामने

मध्य महाराष्ट्रातल्या घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आजपासून पुढचे दोन दिवस म्हणजेच 4 जुलैपासून 6 जुलैपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस होऊ शकतो.  पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये आजपासून मुसळधार पाऊस पडण्याती शक्यता वर्तवली जात आहे. या शिवाय मुंबई , मुंबई उपनगर , कोकण भागात सध्या बऱ्यापैकी पाऊस सुरू असून तो तसाच कायम असेल.

अधिक वाचा- राज्यात 5-6 महिन्यात मध्यवर्ती निवडणुका होणार?, शरद पवार यांनी NCPच्या आमदारांना दिल्या महत्त्वाच्या सूचना
 
या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

पुढील 48 तास कोकण आणि अंतर्गत भागात मान्सून राज्यात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. तसंच आजपासून कोकण, राज्याच्या अंतर्गत भागात आणि विदर्भाच्या काही भागात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात आणि कोकणात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी