Weather Update: मान्सूनने धरला जोर, या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस

monsoon rain update : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 2 दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, ईशान्येकडील राज्यांचे उर्वरित भाग आणि उप हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

Weather Update: मान्सूनने धरला वेग, या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अनेक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात
  • कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पूर्वमोसमी पावसाची शक्यता
  • काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

मुंबई :  नैऋत्य दिशेला मान्सूनने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांत मान्सूनने दणका दिला आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीच्या वेशीवर मान्सून दाखल झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे. तसेच काल कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तसेच कोकणातील काही तालुक्यात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली आहे.

अधिक वाचा : 

अहमदनगरचे नावं अहिल्यानगर करा : पडळकर

या भागात चांगला पाऊस होईल

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2 दिवस मध्य अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक, कोकण, गोवा, तामिळनाडू, दक्षिण-पश्चिम बंगालचा उपसागर, पश्चिम मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागर, ईशान्य राज्ये, उप- हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या प्रदेशात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल आहेत, या भागात चांगला पाऊस होऊ शकतो.

अधिक वाचा : 

मोदी सरकारमुळे शोषित, वंचितांना मिळाले संरक्षण : भांडारी

बंपर कृषी उत्पादनाची पूर्ण क्षमता

भारताच्या पावसावर आधारित कृषी क्षेत्रामध्ये या पावसाळ्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार बंपर कृषी उत्पादनासोबतच महागाईवरही नियंत्रण राहण्याची अपेक्षा आहे. IMD ने म्हटले आहे की या मान्सून हंगामातील सरासरी पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 103 टक्के असेल. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, देशातील बहुतांश भागात चांगला पाऊस होईल.

अधिक वाचा : 

Sakinaka Case : साकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय

उष्णतेची लाटही परत येण्याची शक्यता

भारतीय हवामान खात्याने (IMD) गुरुवारी अंदाज वर्तवला आहे की पुढील 5 दिवसांत बिहार, झारखंड, ओडिशा आणि गंगा पश्चिम बंगालमध्ये विखुरलेला पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. IMD ने पुढे माहिती दिली की 2 आणि 3 जून रोजी राजस्थान, दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा, दक्षिण उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेश 3 आणि 4 जून आणि विदर्भात 2-5 जून दरम्यान उष्णतेची लाट परत येण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : 

Mhada Good news । खुशखबर, म्हाडाने आणली मुंबईकरांसाठी तयार करणार आतापर्यंत सर्वात मोठी मेगा टाऊनशीप

मागीलच्या 24 तासांमध्ये विदर्भात 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात विविध ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होत असून, उकाड्यात वाढ झाली आहे. रत्नागिरी, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी, तर नाशिक, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी