मुंबई : समृध्दी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी नागपूरात आलेल्या पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधाला. (What exactly did Uddhav Thackeray say to the Chief Minister of Karnataka?)
अधिक वाचा : धक्कादायक ! शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी चक्क 'निर्भया' फंडातून खरेदी केलेल्या गाड्यांचा वापर
उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री अतिशय मस्तीत किंवा माज आल्यासारखं बोलत आहेत. काल त्यांनी कहर केला. सीमावादाचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे, असंच ते म्हणत आहेत. पण महाराष्ट्र जसा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे, तसंच कर्नाटकनेही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट बघायला काय हरकत आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले
तसेच त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावरही हल्ला चढवला. महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहे, असं आपण म्हणतो. पण फुले-आंबेडकरांचा अपमान करणारा माणूस राज्यपाल पदावर बसलेला असेल आणि तोच माणूस आज पंतप्रधानांच्या व्यासपीठावर बसलेला असेल, तर महाराष्ट्राच्या जनतेनं समजायचं काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.