“.... तुम्हारा क्या काम,” भोंग्यावरुन सुजातला मनसेचा सवाल

भोंग्यांवरुन राज ठाकरेंना जाहीर आव्हान देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकरांना मनसेच्यावतीने उत्तर देण्यात आले आहे.

“.... तुम्हारा क्या काम,” भोंग्यावरुन सुजातला मनसेचा सवाल ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भोंग्यांवरुन राजकारण तापले
  • सुजात आंबेडकरांनी दिलं होतं आव्हान
  • मनसेच्यावतीने सुजात आंबेडकरला उत्तर

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत इशारा दिला होता की,  ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावू. यावर बहुजन वंचित आघाडीचे नेते सुजात आंबेडकर (sujat Ambedkar) यांनी माझी राज ठाकरे यांना विनंती आहे, ते स्पीकर लावण्यासाठी अमित ठाकरे यांना पाठवा आणि आधी अमित ठाकरे (amit thackeray) यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा, असा टोला लगावला होता. त्याला आता मनसेच्या वतीने प्रतित्तुर देण्यात आले आहे. (".... what is your job," Sujat asked MNS)

अधिक वाचा : "मी शरद पवारांचा माणूस" वर भाजपने राऊतांची उडवली खिल्ली

राज ठाकरे यांच्या सभेनंतर सुजात आंबेडकर यांनी कडाडून टीका केली होती. मला यांना एवढीच विनंती करायची आहे की माझा तुमच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा आहे, फक्त तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा,मला तिकडे एकही बहुजन पोरगा नको आहे. जितकी लोकं हनुमान चालिसा म्हणायला जात आहेत त्यांनी टी-शर्ट काढून जाणवं दाखवावं, मग हनुमान चालिसा म्हणा,” असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलं होतं.

अधिक वाचा : पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही लिंबू महाग, किंमत पाहून थक्क व्हाल...

त्याला मनसेच्यावतीने सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्वीट करत सुजात आंबेडकरांचा टीकेला प्रतित्तुर दिलं आहे. “मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है,” असा सवाल केला आहे. “सुजात यांना कोणी मध्ये बोलायला सांगितलं आहे , तुमचे राजकारणातले वय काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची तरी समज आली आहे का….?,” अशी असा टोला शालिनी ठाकरे यांनी लगावला आहे.

राज ठाकरे म्हणाले होते की,, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा.”

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी