शिंदेंसोबत जाणार का म्हटल्यावर राजन साळवी म्हणाले...

shivsena mla : शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा काल पासून सुरू आहे. त्यावर आज साळवी यांनी स्पष्टीकरण दिले.

When asked why he will go with Shinde, Rajan Salvi said...
शिंदेंसोबत जाणार का म्हटल्यावर राजन साळवी म्हणाले...  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोकणातील तीन आमदार ठाकरेंसोबत
  • राजन साळवी शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा
  • मी ठाकरेंसोबत राहणार असल्याचे स्पष्टीकरण

रत्नागिरी : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंना शिवसेनेतील ४१ आमदारांनी त्यांना साथ दिली. मात्र, कोकणातील ३ आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणे पसंत केले. दरम्यान,  कालपासून त्यापैकी एक आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा रंगू लागली असता आज स्वत: आमदार राजन साळवी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली. (When asked why he will go with Shinde, Rajan Salvi said...)

अधिक वाचा : Udayanraje Bhosale : .... तर काय आभाळं कोसळणार का?, पोलिसांच्या यु टर्नमुळे उदयनराजे संतापले

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझी निष्ठा आहे. मी त्यांच्याशीच प्रामाणिक आहे आणि अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार, असं वक्तव्य कोकणातील शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शिवसेना आणि अपक्ष अशा ५१ आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यांना शिवसेनेच्या १२ खासदारांनीही पाठिंबा दिला. राज्यभरातील अनेक शिवसेनेच्या पदाधिकारी शिंदे यांच्या सोबत जात आहेत. मात्र, सध्या उद्धव ठाकरे यांना सध्या राज्यभरातून १५ सेना आमदारांचं पाठबळ आहे. त्यातही ३ आमदार कोकणातील आहे. भास्कर जाधव, राजन साळवी आणि वैभव नाईक तिघेही 'मातोश्री'च्या जवळचे आहेत. मात्र, काल पासून आमदार साळवी हे शिंदे गटात दाखल होणार असल्याची चर्चा रंगू लागली. त्यावर आता साळवी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अधिक वाचा : Jai Jawan Dahihandi Mandal : जय जवान मंडळाचा 10 थरांचा विक्रम थोडक्यात हुकला 

साळवी म्हणाले, कालपासून माझ्यासंदर्भातील बातम्या येत होत्या. गेले ४० वर्ष मी शिवसैनिक म्हणून काम करतोय. शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळेचा आमदार आणि उपनेता म्हणून महाराष्ट्रात काम करतोय. राजकीय घडामोडींमुळे अशी चर्चा असतील. पण माझी निष्ठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या पायाशी आहे. मी प्रामाणिकपणे ठाकरेंसोबत आहे. मी खुलासा करतोय.. मरेपर्यंत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबत काम करणार आहे. तोच माझा अंत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी