फडणवीस बाजूला बसलेले असतानाच CM शिंदेंने दिले संजय राठोडांबाबत मोठे संकेत

गावगाडा
रोहित गोळे
Updated Jul 09, 2022 | 20:48 IST

CM shinde gave big hint about Sanjay Rathod: संजय राठोडांना मंत्रिपद मिळणार की नाही याविषयी एकनाथ शिंदे यांनी सवाल विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी राठोडांबाबत मोठे संकेत दिले आहेत.

while devendra fadnavis was sitting next to him cm shinde gave a big hint about sanjay rathod
फडणवीस बाजूला बसलेले असतानाच CM शिंदेंने दिले संजय राठोडांबाबत मोठे संकेत  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांनी संजय राठोडांच्या मंत्रिपदाबाबत दिले मोठे संकेत
  • एकनाथ शिंदेकडून संजय राठोडांची पाठराखण?
  • पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपमुळे संजय राठोडांना गमवावं लागलेलं मंत्रिपद

नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून पंतप्रधान मोदींसह भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या भेटी-गाठी घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार याच भेटी-गाठी दरम्यान  मंत्रिमंडळ विस्ताराच्या संपूर्ण चर्चा झाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा कोणत्याही स्वरुपाची बोलणी झाली नसल्याचं पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. याच पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मंत्रिपदाविषयी मोठे संकेत दिले आहेत.  

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Rathod Suicide Case) भाजपच्या (BJP) तीव्र विरोधामुळे संजय राठोड यांना आपलं मविआ सरकारमधील कॅबिनेट मंत्रिपद गमवावं लागलं होतं. पूजाच्या आत्महत्येला संजय राठोड हेच जबाबदार असल्याचं भाजपने तेव्हा वारंवार म्हटलं होतं. त्यामुळे विरोधकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांचा राजीनामा घेतला होता. 

मात्र, आता एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड पुकारलं त्यावेळी संजय राठोड हे देखील त्यांच्या गटात सामील झाले. तेव्हापासून अशी अटकळ व्यक्त केली जात आहे की, शिंदेंच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांना देखील स्थान दिलं जाईल.

अधिक वाचा: शिंदेंच्या हाताला धरलं अन् मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवलं!

याचबाबत आज जेव्हा पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राठोडांना मंत्रिपद देणार की नाही याबाबत थेट भाष्य केलं नाही. किंबहुना ते असंच म्हणाले की, संजय राठोडांना तर पोलिसांनी क्लीनचिट दिली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी राठोडांना मंत्रिपदबाबत कोणताही नकार यावेळी दिलेला नाही. 

पाहा पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे काय म्हणाले:

'मी आपल्याला सांगितलं आहे की, ही फक्त सदिच्छा भेट होती. नवं सरकार स्थापन झालं आहे. तर लोकांना भेटणं ही एक परंपरा आहे. तर आम्ही वरिष्ठांची त्यासाठीच भेट घेतली. आता आषाढी एकादशीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही दोघे मुंबईत परतू. त्यानंतर मी आणि उपमुख्यमंत्री आम्ही बसू आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करु.' 

अधिक वाचा: उद्धव ठाकरेंना बसणार आणखी एक मोठा धक्का?

प्रश्न: संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार?

एकनाथ शिंदे: आता मी म्हटलं ना.. की, आम्ही बसू आणि चर्चा करु. 

प्रश्न: संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. मग अशावेळी त्यांचा समावेश होणार का मंत्रिमंडळात? 

एकनाथ शिंदे: पोलिसांनी तर त्यांना क्लीनचीट दिली आहे. मी तेच सांगतोय की, आम्ही बसू आणि निर्णय घेऊ. आम्ही अद्याप काही ठरवलेलं नाही. मंत्रिमंडळाबाबत आम्ही काही चर्चाच केलेली नाही. हे फक्त आम्ही कालपासून सगळ्यांची भेट आहोत फक्त.  

अधिक वाचा: मुहूर्त ठरला ! मंत्रिमंडळ विस्ताराच्या फाॅर्मूलावर दिल्ली दरबारी शिक्कामोर्तब

या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा संजय राठोडांबाबत एकनाथ शिंदे हे उत्तर देत होते तेव्हा देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या बाजूलाच बसले होते आणि त्यांनी तूर्तास तरी याबाबत काहीही वक्तव्य केलं नाही. त्यामुळे त्यांच्या या मौनाचा नेमका अर्थ काय? असा सवाल आता विचारला जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी