Rajya Sabha निवडणूकीपूर्वी 'ती' पाच मतं कोणाला? Shivsena ची वाढली धडधड

Rajsabha election 2022 : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी अबू आझमी यांनी केलेल्या ट्विटने शिवसेनेची चिंता वाढवली आहे. तर बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी अजून मत कुणाला द्यायचं हे ठरवलं नसल्याचं स्पष्ट केल्याने राज्यसभा निवडणूकीत सस्पेन्स वाढला आहे.

Who got 'those' five votes before Rajya Sabha elections? Shivsena's increased throbbing
Rajya Sabha निवडणूकीपूर्वी 'ती' पाच मतं कोणाला? Shivsena ची वाढली धडधड ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाविकास आघाडीला दोन झटके
  • अबू आझमी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत
  • हितेंद्र ठाकूर यांनी आम्ही १० जूनला भूमिका जाहीर करु, असं म्हटले आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून खळबळ उडाली आहे. आपल्याच मित्रपक्षांना वाचवण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीची मोठी धडपड सुरू आहे. एकीकडे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आपले पत्ते उघडत नाहीत, तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ट्विट करून शिवसेनेला चिंतेत टाकले आहे. अबू आझमी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत, ज्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. (Who got 'those' five votes before Rajya Sabha elections? Shivsena's increased throbbing)

अधिक वाचा : 

पुण्यात तरुणाने गायीवर केला बलात्कार

'महाविकास आघाडी सरकारने तक्रारींवर कोणतीही कारवाई केली नाही'

अबू आझमी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आज अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. जातीयवादी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी किमान समान कार्यक्रमांतर्गत महाविकास आघाडीचा पाया घातला गेला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी सर्व जाती-धर्मांना सोबत घेण्याच्या अटीवर शिवसेनेला पाठिंबा दिला. पत्रात आझमी यांनी अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला असून अडीच वर्षे पूर्ण होऊनही सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे म्हटले आहे.


'आघाडीचा चेहरा आता नव्या हिंदुत्वाचा आहे का?'

अबू आझमींनी पत्रात पुढे लिहिले आहे की, गेल्या अडीच वर्षांत तुम्हाला (उद्धव ठाकरे) अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर अनेकदा पत्र लिहिले, पण तुम्ही एकदाही उत्तर दिले नाही. आघाडीचे सरकार धर्मनिरपेक्ष आहे की, आजकाल तुम्ही ज्या नव्या हिंदुत्वाविषयी बोलत आहात, तोच आघाडीचा चेहरा आहे, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्र सरकारने अडीच वर्षांत या प्रश्नांवर कोणतीही पावले का उचलली नाहीत, याचे स्पष्टीकरण जनतेला देण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची असल्याचे आझमी म्हणाले.

अधिक वाचा : 

अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ‘त्या’ जागेवर भाजपने शिंपडले गोमूत्र, पंचामृत; पोलिसांना बेछूट गोळीबाराचे आदेश कोणी दिले हे सगळ्यांना ठाऊक - भाजप

हितेंद्र ठाकूर यांची धनंजय महाडिकांनी घेतली भेट

भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी उद्धव सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत कोणाला मतदान करायचे याचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे. ठाकूर यांच्या पक्षाकडे एकूण 3 आमदार असून त्यांची भूमिका विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत अतिशय महत्त्वाची ठरू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी