“पेहचान कौन?” नवाब मलिक यांच्या ट्विटचा अंदाज लावण्यासाठी नेटिझन्सच्या उड्या

nawab malik viral tweet, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे ते चर्चेत आले आहेत. फोटो मॉर्फ्ड करून तयार करण्यात आलेल्या इमेजमुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे ? याची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

“पेहचान कौन?” नवाब मलिक यांच्या ट्विटचा अंदाज लावण्यासाठी नेटिझन्सच्या उड्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या एका ट्वीट
  • एक फोटो शेअर केला असून त्यावर ‘पेहचान कौन?’ असा प्रश्न देखील लिहिला आहे.
  • ट्वीट काही मिनिटांमध्येच प्रचंड व्हायरल होत आहे

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात ( Legislative Assembly)सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अधिवेशनाचं वातावरण तापलेलं असतानाच आज अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik)यांच्या एका ट्विटने खळबळ उडावली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटचा अंदाज बांधण्याासाठी अक्षरशः नेटिझन्सच्या उड्या टाकल्या आहेत.  ("Who is the identity?" Netizens jump to predict Nawab Malik's tweet)

मंत्री नवाब मलिक हे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सातत्याने माध्यमांमध्ये चर्चेत राहिले आहेत. मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणापासून (Mumbai Cruise Drugs Case) नवाब मलिक आणि एनसीबी यांच्यातील वादाला सुरुवात झाली. तेव्हापासून माध्यमांमध्ये नवाब मलिक यांची रोजच चर्चा होऊ लागली. शुक्रवारी नवाब मलिक यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे ते चर्चेत आले आहेत. या ट्वीटमध्ये नवाब मलिक यांनी एक फोटो शेअर केला असून त्यावर ‘पेहचान कौन?’ असा प्रश्न देखील लिहिला आहे. आता नवाब मलिक यांनीच असा प्रश्न केल्यानंतर नेटिझन्स देखील आपापले अंदाज तिथे व्यक्त करू लागले आहेत.

नवाब मलिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये एक कोंबडा दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या या कोंबड्याच्या डोक्यावर लाल रंगाचा एक तुरा देखील आहे. पण विशेष म्हणजे या कोंबड्याचा चेहरा मात्र मांजरीचा आहे. नवाब मलिक यांचं हे ट्वीट काही मिनिटांमध्येच प्रचंड व्हायरल होत असून त्यावर तुफान प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत.

त्यांच्या या ट्वीटमधून त्यांनी नेमका कोणाला इशारा दिला आहे. याविषयी मात्र त्यांनी ट्वीटमध्ये कोणतेही सूतोवाच केलेले नसले, तरी नेटिझन्स मात्र त्यांच्या या ट्वीटवर कमेंटन्स देत आहेत. काहींनी तर नवाब मलिक यांचा रोख निलेश राणे यांच्या दिशेने असल्याचा देखील निष्कर्ष काढून टाकला! अर्थात हा फोटो मॉर्फ्ड करून तयार करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील हा फोटो शेअर करताना नवाब मलिक यांना रोख नेमका कुणाच्या दिशेने आहे? याची नवी चर्चा सुरू झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी