shivsena नेमकी कोणाची? केंद्रीय निवडणूक आयोग 30 जानेवारीला अंतिम निर्णय देणार

thackeray vs shinde : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा याचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू असून दोन्ही गटांच्या वकिलांकडून युक्तिवाद केला. यावर आयोगाने दोन्ही पक्षांना आपले म्हणणे लेखी स्वरुपात देण्याची सूचना केली.

Whose Shiv Sena exactly? Arguments of Thackeray and Shinde's lawyers in the Central Election Commission
शिवसेना नेमकी कोणाची? केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • धनुष्यबाण कोणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी
  • शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांकडून युक्तीवाद
  • शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं यावर आयोग आजच निर्णय देण्याची शक्यता

नवी दिल्ली : शिवसेना पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर कोणाचा अधिकार आहे? शिंदे की ठाकरेंचा याप्रकरणी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून युक्तिवाद केला गेला. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सोमवारी लेखी उत्तर देण्यास सांगितलं आहे.  त्यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं यावर आयोग 30 जानेवारीला अंतिम निर्णय देणार आहे. (Whose Shiv Sena exactly? Arguments of Thackeray and Shinde's lawyers in the Central Election Commission)

अधिक वाचा : MPSC Recruitment 2023: MPSC कडून मेगाभरती; 8169 पदांसाठी होणार भरती प्रक्रिया, वाचा कोणत्या पदासाठी आणि वेतन किती

उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपल्यानंतर संघटनात्मक निवडणुकांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ठाकरे गटाच्या वतीने आज ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. गेल्या सुनावणीत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद ऐकून घेतला होता. आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी आपला निर्णय देऊ नये, असे आवाहन केले. आता शिवसेना या वादावर सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

अधिक वाचा : Shani Amavasya 2023 Sun Rise Time: 2023 मधील पहिली शनी अमावस्या, जाणून घ्या पूजा विधी, अमावस्येचा काळ आणि सूर्योदयाची वेळ

कपिल सिब्बल म्हणाले की, ठाकरे गटाचा विचार केला तर पक्ष घटनेतील नियम बदलल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाने कधीही आक्षेप घेतलेला नाही. पक्षाच्या घटनेतील नियमांच्या बाहेर येऊन कोणताही निर्णय घेतला नाही. 

शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांच्या युक्तिवादातील ठळक मुद्दे


१. शिंदे गटाने सादर केलेले प्रतिक्षापत्र तपासा

२. शिंदे गटाने नेमलेली कार्यकारिणी बेकायदेशीर

3. शिंदे यांची प्रतिनिधी सभाच झाली नाही

४. एकनाथ शिंदे यांची निवड कोणत्या घटनेनुसार मुख्यनेते पदी निवड झाली

५. नेता निवडीसाठी आणि सभा घेण्याची मुभा द्यावी 

६. प्रतिनिधी सभा ठाकरे गटासोबतच आहे

७. शिवसेनेची मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही

8. शिंदे गटाच्या राजकीय पक्षच अस्तित्व नाही

९. शिंदे गटाकडून निवड करण्यात आलेल्या नियुक्ती बेकायदेशीर

१०. आमदार आणि खासदारांच्या संख्येपेक्षा पक्षाची संघटना महत्वाची आहे. त्यामुळे पक्षाचे अस्तित्व आमदार आणि खासदारांवर ठरवू नये

अधिक वाचा : Pankaja Munde: नाराजीच्या बातम्यांवर पहिल्यांदा बोलल्या पंकजा मुंडे

शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांनी केलेल्या युक्तीवादातील ठळक मुद्दे


१. एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतापद हे कायदेशीर आहे
२. पक्षघटनेचे शिंदे गटाकडून पालन केले आहे. 
३. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत फूटच पडली

३. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी कशी कशी बनवली?
३. भाजपसोबत युतीचं आश्वासन देऊन मतं मिळवली. निवडून आल्यानंतर सत्तेसाठी मतदारांना सोडून दिले

४. आमच्या संख्येबाबत कोणताही वाद नाही

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी