मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर काढण्यासाठी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. दुसरीकडे, त्यांच्या पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून मंदिरांमध्ये सीसीटीव्ही लावले जातात, मग मशिदींमध्ये का नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. यावर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या मागणीवरुन सरकारला दिलेल्या अल्टीमेटमवरुन कायदा हातात घेऊन नका, अन्यथा कडक कारवाई करु, असा इशारा दिला. (Why is there no CCTV in the mosque? MNS question, Home Minister answers in one word)
तसेच लाऊडस्पीकरच्या वापराबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी ते राज्यातील सर्व राजकीय पक्ष आणि काही संघटनांच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेणार आहेत.
अधिक वाचा : सर्व मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावा, मनसेच्या बाळा नांदगावकरांची मागणी
मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यातील राजकारण तापले आहेत. असताना आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मशिदीत सीसीटीव्ही का बसवले जात नाहीत, असा सवा केल आहे. या मुद्द्यावर गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, यासंदर्भात सरकारकडून कोणतेही निर्देश जारी करण्यात आलेले नाहीत. मंदिरात सीसीटीव्ही आहेत, त्यामुळे मशिदीतील लोकांनाही सीसीटीव्ही लावायचे असतील तर ते लावू शकतात ही चांगली गोष्ट आहे. ज्याने त्याने आपापल्या स्वच्छेने निर्णय घ्यावा, सरकारचं काही म्हणणं नाही. हा निर्णय पूर्णत: ऐच्छिक असल्याचं गृहमंत्र्यांनी ठासून सांगितलं. एकंदर मनसेच्या प्रश्नाचा गृहमंत्र्यांनी एका वाक्यात निकाल लावला.
अधिक वाचा : Child Marriage : अल्पवयीन पत्नीसोबत सेक्स करणे गुन्हाच, कोर्टाने आरोपीचा जामीन फेटाळला
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'जवळपास सर्व मंदिरांमध्ये सीसीटीव्ही लावले आहेत, पण मशिदींमध्ये आहेत का? सर्व धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही का बसवले नाहीत. हे सर्व केले तर अनेक चुकीच्या गोष्टी आपोआप संपतील. तसेच, असे करण्यात कोणतीही अडचण येऊ नये. शासनाने नियम बनवून त्याचे काटेकोर पालन करावे.
अधिक वाचा : Hunar Haat : मुंबईकरांनो हुनर हाटमधील कलेचा खजिना पाहिला का? त्वरा करा, ही आहे शेवटची तारीख
वळसे पाटील म्हणाले, "राज्यात भोंग्यांच्या संदर्भात राज्यात नवा प्रश्न उभा ठाकला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालकांना आढावा बैठक घेण्यास सांगितली होती. त्याप्रमाणे त्यांनी काल बैठक घेतली. या बैठकीतला रिपोर्ट त्यांनी मला दिला. येत्या काही काळात राज्यात जी परिस्थिती उद्भवू शकते, यावर आमची सविस्तर चर्चा झाली. राज्यात सध्या जातीय क्लेष निर्माण करण्याचं काम काही जण करत आहेत. त्यांच्याविरोधात कडक अॅक्शन घेण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत", असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.