राणा दाम्पत्याच्या घरावर फिरणार बुलडोजर?, BMC ने बजावले अतिक्रमणासाठी नोटीस

navneet rana : मुख्यमंत्री ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर 23 एप्रिल रोजी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. सध्या जामीनावर असलेल्या राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानात अतिक्रमण केल्याचे बीएमसीने नोटीस पाठवले आहे.

Will Rana couple's house be demolished by a bulldozer ?, BMC warns for encroachment
राणा दाम्पत्याच्या घरावर फिरणार बुडलोजर?, BMC ने बजावले अतिक्रमणासाठी नोटीस   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • BMC ने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
  • ७ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
  • BMC त्यांच्या परवानगीशिवाय नमूद केलेल्या बांधकामाविरुद्ध कारवाई करेल

मुंबई : बीएमसीने अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना महापालिका अधिनियम कलम 351(1A) अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्या खास येथील निवासस्थानावर अतिक्रमण करून ते बांधकाम केल्याचे बीएमसीचे म्हणणे आहे. (Will Rana couple's house be demolished by a bulldozer ?, BMC warns for encroachment)

अधिक वाचा : 

BREAKING : खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर संभाजीराजेंची 'नवी दिशा, नवा पर्याय...',

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाची घोषणा केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. त्यानंतरही राणा दाम्पत्य ठाकरे सरकारवर व शिवसेनेवर टिका करीत आहे. 

अधिक वाचा : 

राज्यातील विमानतळ विकासासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

बीएमसीने नाक दाबलेला

राज्य सरकारसोबतच आता बीएमसीनेही या दाम्पत्यावर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. खार परिसरात लाव्ही इमारतीच्या आठव्या मजल्यावर रवी राणा यांचा फ्लॅट आहे. बीएमसी पथकाने 4 मे रोजी रवी राणा यांच्या खारमधील घराची पाहणी केली. या घरामध्ये अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा आरोप आहे. या पाहणीत  रवी राणा यांनी त्यांच्या घरात मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त काही अंतर्गत बदल केले आहे. या घराची बाल्कनी वाढवली आहे.

अधिक वाचा : 

Raj Thackeray :  उद्धव ठाकरे तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाहीत, राज ठाकरे यांचा राज्य सरकारला इशारा

सोसायटीचे पदाधिकारी आणि उपभोक्ता म्हणून आमदार रवी  राणा यांच्या नावे ही नोटिस पाठवण्यात आली आहे. आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत रवी राणा तुरुंगात असताना राणा दाम्पत्याच्या घरावर नोटीस चिकटवली होती.

बीएमसी पथकाच्या तपासणीत राणा दांपत्याच्या घरी एकूण 10 ठिकाणी नियमांचं उल्लंघन आढळलं आहे.  नियमांचं उल्लंघन का केलं?, मंजूर आराखड्याशिवाय अधिकचं बांधकाम करतांना परवानगी घेतली का याची समाधानकारक उत्तरे येत्या  सात  दिवसांत येणे अपेक्षित आहे. अन्यथा पालिकेकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी