young man did a shocking act by changing his WhatsApp status : व्हॉट्सअॅप हे भारतातील एक लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. या अॅपवर डीपी आणि स्टेटस बदलत राहणे अनेकांना आवडते. महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या तरुणाने जेव्हा व्हॉट्सअॅप स्टेटस बदलले तेव्हा पण अनेकांना असेच वाटले. काही जणांनी उत्सुकतेपोटी तरुणाने सेट केलेले स्टेटस बघितले आणि त्यांना धक्काच बसला.
सांगली जिल्ह्यातील औदुंबर विजय जगताप नावाच्या 22 वर्षांच्या तरुणाने व्हॉट्सअॅपवर भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस सेट केले. हे स्टेटस सेट केल्यानंतर तरुणाने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या मृत्यूनंतर लक्षात आले. औदुंबरच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
माागील काही आठवड्यात महाराष्ट्रात व्हॉट्सअॅपवर भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस सेट करून आत्महत्या करण्याच्या काही घटना घडल्या आहेत. अचानक घडू लागलेल्या या सर्व घटनांमध्ये काही समांतर दुवा आहे का ही शक्यता पण पोलीस तपासत आहेत.
14 देशांचा जावई, 105 वेळा केले लग्न