हो हे खरंय! सोलापूरात मिळतंय चक्क १ रुपयात १ लिटर पेट्रोल, सकाळपासूनच पेट्रोल पंपावर तुंबळ गर्दी

1 liter petrol in 1 rupees in solpaur : १ रुपयात मिळणारे पेट्रोल हे एका लाभार्थ्याला एक लिटर प्रमाणे मिळणार आहे. त्यामुळे, जवळपास ५०० लिटर पेट्रोलचे वितरण या ठिकाणाहून होणार असून ५०० लाभार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. गुरुवारी दिवसभर या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनच पेट्रोल पंपावर तुंबळ गर्दी दिसून आली.

1 liter petrol in 1 rupees in solpaur
हो हे खरंय! सोलापूरात मिळतंय चक्क १ रुपयात १ लिटर पेट्रोल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पेट्रोल १ रुपयांत मिळत असल्याने पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांची तुफान गर्दी
  • पेट्रोलच्या वाढत्या दरवाढीचा निषेध म्हणून १ रुपयात पेट्रोल – आयोजक
  • गुरुवारी दिवसभर या योजनेचा लाभ घेता येणार                                                      

सोलापूर : पेट्रोलचे भाव १२० रुपये प्रतीलिटर झाल्यामुळे सर्वसामान्य जनता नाराज असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, आज चक्क रुपया लिटर पेट्रोल मिळाल्याने अनेकांची चांदी झाल्याचे पहायला मिळाले. मात्र, १ रुपयात पेट्रोल मिळतंय हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही,मात्र हे खर आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या ( Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2022 ) जयंतीनिमित्त सोलापुरात आज (गुरुवारी) दिवसभर एका रुपयात एक लिटर पेट्रोल  वाटप करण्यात आले आहे. पेट्रोल १ रुपयांत मिळत असल्याने पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांची तुफान गर्दी उसळली उसळल्याचे पाहायला मिळाले. ही गर्दी नियंत्रनात आणण्यासाठी पेट्रोल पंप चालकाने पोलीस बंदोबस्त मागविला होता.

अधिक वाचा : लग्नसराईत सोन्याच्या भावात येणार मोठी तेजी, लवकर करा खरेदी

पेट्रोलच्या वाढत्या दरवाढीचा निषेध म्हणून १ रुपयात पेट्रोल – आयोजक

राज्यात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली असून, वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डीझेलचे दरांनी देखील शंभरी पार केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात आज (गुरुवारी) दिवसभर एका रुपयात एक लिटर पेट्रोल  वाटप करण्यात आले आहे. १ रुपयात १ लिटर दिल्या जाणाऱ्या पेट्रोलच्या आयोजकांनी म्हटलं आहे की, पेट्रोलच्या वाढत्या दरवाढीचा निषेध म्हणून १ रुपयात पेट्रोल देत आहोत. त्याचबरोबर, पेट्रोल १ रुपयांत उपलब्ध करून केंद्र सरकारला संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती राहुल सर्वगोड यांनी दिली आहे. एकीकडे दिवसेंदिवस महागाईचा सामान्य जनतेला फटका सहन करावा लागत आहे. तर, दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सोलापुरातील नागरिकांना पेट्रोल १  रुपये लीटर मिळत असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.

अधिक वाचा ; IPL 2022: सूर्यकुमारची चूक ठरली मुंबईच्या पराभवाचे कारण? 

गुरुवारी दिवसभर या योजनेचा लाभ घेता येणार                                                      

१ रुपयात मिळणारे पेट्रोल हे एका लाभार्थ्याला एक लिटर प्रमाणे मिळणार आहे. त्यामुळे, जवळपास ५०० लिटर पेट्रोलचे वितरण या ठिकाणाहून होणार असून ५०० लाभार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. गुरुवारी दिवसभर या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनच पेट्रोल पंपावर तुंबळ गर्दी दिसून आली.

अधिक वाचा : नोकरी गेली झाला डिलिव्हरी बॉय, व्हायरल पोस्टमुळे मिळाली बाइक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी