बीड : रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून एका मुलीने आपले आयुष्य संपविले असल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. सदर मुलगी ही अल्पवयीन होती. दीपालीरमेश लव्हारे असं १७ वर्षीय आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती अंबाजोगाई तालुक्यात १२ वीच्या वर्गात शिकत होती. दीपालीलव्हारे या विद्यार्थीनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटना मंगळवारी घडली आहे. पोलिसांनी दिपालीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयित तरूणावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, बर्दापूर पोलीस सदर घटनेचा तपास करत आहेत.
अधिक वाचा : बनावट अकाउंटची माहिती मिळेपर्यत ट्विटरची डील स्थगित: मस्क
मिळालेल्या माहितीनुसार, दीपालीला त्रास देणारा मुलगा हा तिच्या घराशेजारी राहत होता. सदर संशयित मुलाचे नाव अकबर बबन शेख असं आहे. अकबर हा मागील काही दिवसापासून दीपालीकॉम्प्युटर क्लासला जात - येत असताना तिची छेड काढत होता. त्याचबरोबर दीपालीला रस्त्यात अडवून अकबर हा दीपालीला त्रास देखील देत होता. हा सर्व प्रकार दीपालीने तिच्या आईला देखील सांगितला होता. असं तिच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, दीपालीने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. दीपालीचे वडील राज्य परिवहन मंडळात चालक असून सध्या पालघर येथे कार्यरत आहेत.
अधिक वाचा : एलोन मस्कची ट्विटर डील होल्डवर पडताच बाजार गडगडला
मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आई गावातील जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेली होती. त्यामुळे, घरात कोणी नसताना दीपालीने साडीने गळफास घेत आपले आयुष्य संपविले आहे. रात्री ११ वाजताच्या सुमारास आई घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यापूर्वी देखील दीपालीच्या वडिलांनी शुक्रवारी अकबरला घरी बोलावून घेतले होते. आणि दीपालीला त्रास देऊ नको अशा समज दिली होती. परंतु सदर तरुणाच्या वागण्यात थोडाही फरक पडला नाही. त्याचे त्रास देणे सुरूच होते. त्यावर वडील आणि भाऊ आला की आपण यातून मार्ग काढूत अशी आईने तिची समजूत घातली. अखेर सततच्या त्रासाला कंटाळलेल्या दीलीने कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप दीपालीच्या आईने केला आहे.
अधिक वाचा : अशी दिसते हळद चंदनाचं क्रीम लावणारी मृणाल कुलकर्णी
दीपालीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अकबर शेख या तरुणाच्या विरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याची नाहीती माहिती मिळाली आहे.