'या' जिल्ह्यात ५० गावांसाठी बसच्या १५० फेऱ्या ८ जूनपासून सुरू

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 07, 2020 | 12:55 IST

उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ आगारातून पन्नास गावांसाठी ही बससेवा पुन्हा सुरू होणार आहे.अशी माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक साळवी यांनी दिली आहे.

150 round trips for 50 villages in 'Ya' district from June 8
'या' जिल्ह्यात ५० गावांसाठी बसच्या १५० फेऱ्या ८ जूनपासून सुरू  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • उस्मानाबाद जिल्ह्यातील महामंडळाचे दररोज ४५ लाखाच्या उत्पन्न
  • ६ आगारातून सुरू होणार बससेवा
  • जिल्ह्यातील बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती

उस्मानाबाद: सध्या देशात आणि राज्यात कोरोना विषाणूने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये, यासाठी सरकारने लॉकडाऊन केले होते. पण आता देशात अनलॉक १.० सुरु झालं आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली लालपरी पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे.

६ आगारातून सुरू होणार बससेवा

उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ आगारातून पन्नास गावांसाठी ही बससेवा पुन्हा सुरू होणार आहे.अशी माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक साळवी यांनी दिली आहे. दरम्यान कोरोना साथीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यातील हजारो बसेस एकाच जागेवर अनेक दिवसांपासून उभ्या होत्या.त्यामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील दररोज ४५ लाखाच्या उत्पन्न

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील बस सेवा अनेक दिवसांपासून बंद असल्याने जिल्ह्यातील महामंडळाला देखील मोठा भुर्दंड सहन करावा लागला आहे.मात्र आता परस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.त्यामध्ये एक भाग म्हणून बस चालकांना देखील एक उभारी देण्याचे काम केले जात आहे.दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील बससेवा ८ जूनपासून सुरू होणार असून,या जिल्ह्यातील बसेस या फक्त जिल्ह्यातच धावणार आहेत.

उस्मानाबाद आगारातून अशा सुटणार बस

तेर, ढोकी, मेंढा,कोडं, बामणी, धुत्ता, लोहारा,वाशी, तुळजापूर, कौडगाव,उमरगा

उमरगा आगारातून अशा सुटणार बस

उस्मानाबाद,लोहार,सास्तुर, नांगरवाडी,माकणी, दाळिंब,मुरूम, कंटेकुर, डिगी,नळदुर्ग

भुम आगारातून अशा सुटणार बस
उस्मानाबाद,वाशी, इट, पाठरुड, भांडगाव, तांदुळवाडी, वाशी, देवळाली,येरमाळा, वालवड वंजारवाडी

तुळजापूर आगारातून अशा सुटणार बस

नंदगाव, उस्मानाबाद, नळदुर्ग, तामळवाडी, लोहारा, सावरगाव,आलुर, बेंबळी, नांगरवाडी

कळंब आगारातून अशा सुटणार बस

उस्मानाबाद,येरमाळा,वाशी, येडशी

परांडा आगरभूम, उस्मानाबाद, डोंजा, अनाळा

यापूर्वीही सुरू झाली होती बससेवा

गेल्या काही दिवसापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती, दरम्यान उस्मानाबाद जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये होता. उस्मानाबाद जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, किंवा संशय नव्हता, त्यामुळे प्रशासनाने बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. बस सेवा ११ मे पासून सुरू करण्यात आली होती. डाऊन च्या काळात बंद असलेली बससेवा सुरू होण्यासाठी, काही अटी देखील घालून दिल्या होत्या. 

रूग्ण आढळला आणि बस फेऱ्या झाल्या होत्या कमी

उस्मानाबाद जिल्ह्यातील बससेवा ही प्रशासनाने अगदी सुरळीतपणे सुरू केली होती. मात्र अचानकपणे परांडा तालुक्यातील एका गावामध्ये कोरोनाचा बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर बसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. मात्र आता बसफेऱ्या पुन्हा वाढवण्यात आले आहेत. मात्र या बसफेऱ्या जिल्हा अंतर्गत असणार आहेत. सध्या पन्नास गावासाठी १५०  बस फेर्‍या असणार आहेत.

शहरातील दुकाने व्यवस्थितपणे सुरू

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १०० च्या पुढे गेला असून, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही दिवसापूर्वी उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये होता, मात्र जिल्ह्यातील बाधितांची संख्या अचानक पणे वाढल्याने जिल्ह्यातील नागरिक चिंतेत आहेत.मात्र प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे उस्मानाबाद शहरातील दुकाने सुरळीतपणे सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी