'या' जिल्ह्यात कोरोनाचा कहर, १६३ बाधित आढळल्याने खळबळ

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 23, 2020 | 19:28 IST

163 corona positive patient found in aurangabad : औरंगाबादेत १६३ रुग्ण आढळून आल्याने खळबळ आहे. दरम्यान औरंगाबादेत कोरोनाचा आकडा मात्र कमी होताना दिसत आन्ही.त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे.

163 corona positive patient found in aurangabad
औरंगाबादेत आढळले १६३ बाधित,जिल्ह्यात   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • औरंगाबादेत २३ जून रोजी आलेल्या अह्वालात विक्रमी वाढ झाली असून १६३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले
  • आतापर्यंत २०४६ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराने कोरोनामुक्त
  • औरंगाबाद येथे उपचारादरम्यान २०३ जणांचा मृत्यू

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात (aurangabad district)कोरोनाचे (corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. काही दिवसापूर्वी औरंगाबादला काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा रुग्णसंख्या वाढत जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. औरंगाबादेत २३ जून रोजी आलेल्या अह्वालात विक्रमी वाढ झाली असून १६३ कोरोनाबाधित (corona positive) रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान १६३ जणांची वाढ झाल्याने औरंगाबादेतील बाधितांची संख्या ३८१९ वर जाऊन पोहचली असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

महापालिका (mahapalika ) क्षेत्रातील बाधित रुग्ण

एन नऊ सिडको (३), अंबिका नगर (३), पडेगाव (३), भानुदास नगर (७), न्यू नंदनवन कॉलनी (१), विष्णू नगर (१), उल्का नगरी (१), पद्मपुरा (५), क्रांती नगर (१), नागेश्वरवाडी (२), नक्षत्रवाडी (१), एन पाच सिडको (२), एन सहा, मथुरा नगर (३), गजानन नगर (६), औरंगपुरा (१), जय भवानी नगर (८), एन सहा, संभाजी कॉलनी (१), नानक नगर (१), शिवनेरी कॉलनी, गारखेडा (१), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (१), एन सहा सिडको (२), सेवा नगर हाऊसिंग सोसायटी (१),  शिवाजी नगर (४), सिडको एन चार, जय भवानी नगर (१), बौद्ध नगर, जवाहर कॉलनी (१), शिवशंकर कॉलनी (४), बायजीपुरा (१), हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (१), सिडको (१), तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी (१), उत्तम नगर (१), समर्थ नगर (१), म्हाडा कॉलनी (१), अरिफ कॉलनी (१), कोटला कॉलनी (१), उस्मानपुरा (१), सुरेवाडी (१), विजय नगर (२), गारखेडा परिसर (१), रशीदपुरा (१), सिडको महानगर दोन,

वाळूज (४), जय गजानन नगर (१ ), अन्य (१), कैलास नगर (१), एन दोन सिडको (३), जोहरीवाडा, गुलमंडी (१), राजेसंभाजी नगर (१), बन्सीलाल नगर (१), रमा नगर (१), हनुमान नगर (२), सातारा परिसर (१), मयूर पार्क राज हाइट, सेव्हन हिल जवळ (१), जे सेक्टर, मुकुंदवाडी (१), भगतसिंग नगर (३), विठ्ठल नगर, मुकुंदवाडी (१), कॅनॉट प्लेस (१), न्यू विशाल नगर (१), श्री साईयोग हाऊसिंग सोसायटी (१), राजेसंभाजी कॉलनी, जाधववाडी (१), मुकुंदवाडी (२), मयूर नगर (१), आयोध्या नगर (२), बौद्धवाडा चिकलठाणा (१), चिकलठाणा हनुमान चौक (२), या भागातील आहेत कोरोनाबाधित रुग्ण.

ग्रामीण भागातील कोरोनाबाधित

 बजाज नगर (३), भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), करमाड (६), फत्तेह मैदान, फुलंब्री (१), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (१), कोलघर (२), गजगाव, गंगापूर (१ ), लासूर नाका,गंगापूर (१), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (१), शिवूर बंगला (२), कविटखेडा, वैजापूर (१), शिवूर (५), मधला पाडा, शिवूर, वैजापूर, मांडकी (२), सिद्धीविनायक हाऊसिंग सोसायटीजवळ, बजाज नगर (२), राजतिलक हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (५), ओयासिस चौक, पंढरपूर (१), ग्रोथ सेंटरजवळ, बजाज नगर (१), हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (२), सारा गौरव, बजाज नगर (२), जय भवानी चौक, बजाज नगर (१), एन अकरा, मयूर नगर, हडको (२), पंचगंगा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (१), संजीव हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), बीएसएनएल गोदामाजवळ बजाज नगर (१), वडगाव (१), विराज हाईट, बजाज नगर (१), दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी (१)

२०३ जणांचा मृत्यू

औरंगाबाद येथे उपचारादरम्यान २०३ जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत २०४६ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराने कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर १५७० कोरोनाबाधितावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी