तब्बल १७ वर्षांनी पत्नी सोडून गेलेल्या दिवशीच पतीने घेतला गळफास, मृत्यूपूर्वी केलं 'असं काही'

17 years after the death of his wife, the husband also hanged himself : पत्नीचा मृत्यू नागपंचमीच्या दिवशी झाला होता. त्यामुळे याच दिवशी पती संजय शिंदे यांनी आपल्या शेतातील पळसाच्या झाडाला नागपंचमी दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय शिंदे यांनी गळफास घेतला असल्याचे शेताशेजारील शेतकऱ्यांनी पहिले आणि याची माहिती शिंदे यांच्या कुटुंबातील व्यक्तींना दिली. १७ वर्षापूर्वी पत्नीचे निधन होऊन देखील संजय हे पत्नीच्या आठवणी नेहमीच काढत होते

17 years after the death of his wife, the husband also hanged himself
१७ वर्षांनी पत्नी सोडून गेलेल्या दिवशीच पतीने घेतला गळफास   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • १७ वर्षापूर्वी पत्नीचा मृत्यू होऊन देखील पत्नीच्या विरहामुळे पतीने केली आत्महत्या
  • संजय शिंदे यांनी शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली
  • आत्महत्येपूर्वी शिंदे यांनी पत्नीसह असलेला फोटो ठेवला होता.

हिंगोली : १० ऑगस्ट २००५ रोजी नागपंचमीच्या दिवशी संजय दादाराव शिंदे यांच्या पत्नीचे निधन झाले होते. या घटनेला तब्बल १७ वर्षा उलटून गेले तरी पती संजय शिंदे हे रोज पत्नीची आठवण काढत होता. अखेर पत्नीचा ज्या सणा दिवशी निधन झाले अखेर त्याच दिवशी पतीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटना हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बाबळी या गावात घडली आहे. १७ वर्षापूर्वी पत्नीचा मृत्यू होऊन देखील पत्नीच्या विरहामुळे संजय शिंदे यांनी पत्नीच्या आठवणीत २ ऑगस्ट रोजी नागपंचमीच्याच दिवशी गळफास लावून आत्महत्या केली आहे.

अधिक वाचा ; आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल

संजय शिंदे यांनी शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली

पत्नीचा मृत्यू नागपंचमीच्या दिवशी झाला होता. त्यामुळे याच दिवशी पती संजय शिंदे यांनी आपल्या शेतातील पळसाच्या झाडाला नागपंचमी दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय शिंदे यांनी गळफास घेतला असल्याचे शेताशेजारील शेतकऱ्यांनी पहिले आणि याची माहिती शिंदे यांच्या कुटुंबातील व्यक्तींना दिली. १७ वर्षापूर्वी पत्नीचे निधन होऊन देखील संजय हे पत्नीच्या आठवणी नेहमीच काढत होते अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे.

अधिक वाचा ; गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिय

आत्महत्येपूर्वी शिंदे यांनी पत्नीसह असलेला फोटो ठेवला होता.

संजय शिंदे यांनी पळसाच्या झाडाला आत्महत्या करत आपले आयुष्य संपविले आहे. शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ज्या झाडाखाली आत्महत्या केली त्याचा झाडाखाली पत्नी आणि आपला सोबत असलेला एक फोटो ठेवला होता. शिंदे यांनी पत्नीसह असलेला जो फोटो ठेवला होता. त्या फोटोवर शिंदे त्याच्या लग्नाची तारीख आणि पत्नीच्या मृत्यूची तारीख देखील ठेवली लिहिली होती. त्याचबरोबर, याच चिठ्ठीत पत्नीच्या आठवणींबद्दल एक काव्य देखील लिहून ठेवले होते.

अधिक वाचा  : बॅडमिंटनच्या सांघिक सामन्यात पी.व्ही. सिंधूचा विजय पण... 

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कळमनुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

दरम्यान, शिंदे यांच्या आत्महत्येनंतर सदर प्रकरणाला वेगेळे वळण लागले आहे. शिंदे यांचे मोठे भाऊ प्रभाकर दादाराव शिंदे यांनी संजय शिंदे यांच्या पत्नीवर आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संजय यांनी दुसरी पत्नी अलका संजय शिंदे यांच्या होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे. प्रभाकर शिंदे यांनी अलका शिंदे यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून अलका यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कळमनुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. संजय यांच्या पश्चात दोन मुलं व एक मुलगी असा परिवार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी